CM says, Always striving for the dream of a cataract free state : विदर्भातील मास्टेक, शंकरा फाऊंडेशन व यूएसए संस्थाचा पुढाकार
Mumbai मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए या संस्था ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन’ cataract free Maharashtra Mission मध्ये शासनाला सर्वोतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरवर्षी साधारण एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट या संस्थांचे आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी नक्कीच मोलाचे सहकार्य राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे आरोग्य प्राधान्य क्रमावर ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन शासनाने हाती घेतले आहे, असं ते म्हणाले.
CM Devendra Fadnavis : जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने!
या मिशनला २०१८ मध्ये नव्याने सुरवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, शालेय शिक्षण या विविध विभागांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या मिशनची राज्यातील यशस्विता पाहून राष्ट्रीय अंध निवारण कार्यक्रम व धर्मदाय रूग्णालयांचे सहकार्य लाभत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
CM Devendra Fadnavis : नागपूरमध्ये होणार व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर
मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय व धर्मदाय रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येत आहेत. हे मिशन यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय व धर्मदाय रुग्णायलये मिळून साधारण ३५० ऑपरेशन थिएटर येथे दररोज किमान दहा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते.
या उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगाने हे मिशन सुरू झाल्यापासुन २०१७ ते २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत साधारण साडेसतरा लाख व २०२२-२३ यावर्षात साधारण नऊ लाख मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे मार्च, २०२४ अखेर पर्यंत नऊ लाख ४५ हजार ७३३ मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून संबंधित रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर मोफत चष्मे देखील देण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.