CM Devendra Fadnavis : दंगलीतील आरोपी दंगलीचे ‘सत्य’ कसे शोधणार?

 

Congress truth-finding committee includes riot accused : काँग्रेसच्या सत्य शोधन समितीवर मुख्यमंत्र्यांचा आरोप

Nagpur महालमध्ये दि. १७ मार्चला घडलेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपुरात दाखल झाले. त्यांनी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली. सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. दंगल पूर्वनियोजित होती, असं दोन दिवसांपूर्वी ते सभागृहात म्हणाले होते. आज मात्र त्यांनी दंगल पूर्वनियोजित होती का, याबबात अद्याप स्पष्टता आलेली नाही, असे सांगितले.

दरम्यान, दंगलग्रस्त भागात जाण्यास काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला मज्जाव घालण्यात आला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या सत्यशोधन समितीवरही मुख्यमंत्र्यांनी आरोप केले. दंगलीचे आरोपीच दंगलीचा आढावा घ्यायला कसे काय जाऊ शकतात, असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

काँग्रेसची समिती सत्य शोधायला नव्हे तर लांगुलचालन करण्यासाठी आली असल्याचा थेट आरोप केला. अकोला दंगलीतील आरोपी या समितीचा सदस्य असल्याने ते काय फॅक्ट फाईंड करणार असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

CM Devendra Fadnavis : धोत्रा नंदाईसह १४ गावांना पाणी मिळणार!

या समितीला घटनास्थळी जाण्यास रोखण्यात आले आहे. समितीने महायुती सरकार व पोलिसांवर आरोप केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, ‘या समितीला फक्त राजकारण करायचे आहे, एका समाजाची सहानुभूती मिळावायची असल्याने ते नागपूरमध्ये आले आहेत. ज्या भागात दंगल घडली तेथे संचारबंदी लागू लागू आहे. त्यामुळे पोलिस परवानगी मिळणारच नव्हती.’

CM Devendra Fadnavis : ‘एआय अनझीप्ड’ पुस्तकामुळे कार्यक्षमता वाढेल

समितीत अकोल्याचे आमदार साजिद पठण यांचाही समावेश आहे. त्यांचे नाव न घेता फडणवीस यांनी अकोल्याच्या दंगलीतील आरोपीला समितीत घेतले असल्याची टीका केली आहे. हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले त्यांना सात दिवसांच्या आत नुकसान भरपाई दिली जाईल. हिंसाचारातील आरोपींना मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी केले आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी फडणीस यांनी दिला.