Breaking

CM Devendra Fadnavis : निवडणुका आल्या, जनता दरबारात गर्दी वाढली!

Distribution of ownership rights to slum dwellers in Janata Darbar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गर्दी, झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप

Nagpur सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील जनता दरबाराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. मोठ्या संख्येने निवेदनांची गर्दी उसळली. सगळे आमदार आणि अधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी हजारो झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा दिला. हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ वेगवेगळया झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या २१ झोपडपट्टीधारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला.

Nago Ganar : माजी आमदाराची एसआयटी चौकशीची मागणी!

नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी हजारो झोपडपट्टीधारकांची इच्छा आहे. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिका, नझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशी, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, आदी यावेळी उपस्थित होते.

Minister Akash Fundkar : बियाणे-खतांची साठेबाजी करणाऱ्यांना सज्जड दम

सर्वसामान्य नागरिकांना जनता दरबारातून आपले प्रश्न मार्गी लागतात असा लोकांचा विश्वास वाढीस लागला आहे. यासाठी जाणीवपूर्वक महिन्यातून एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूर मध्ये मुख्यमंत्री या नात्याने मी करतो. यात प्राप्त झालेल्या लोकांच्या निवेदनांवर गंभीरतेने विचार करून पात्र असलेल्या प्रत्येकाला न्याय मिळतो ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हैदराबाद हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात महिलांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत, तरूणांपासून दिव्यांग व्यक्तिंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना आपली निवेदने दिली.