Don’t forget that your values have integrity : ‘बनाए जीवन प्राणवान’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
Nagpur अनेकदा पुरोगामी लोकांकडून देशाची संस्कृती, परंपरा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. अशा लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच चिमटा काढला आहे. आपल्या सभ्यतेला, परंपरेला शाश्वत मूल्यांना जपत यातील काही मूल्य काळाच्या परिघावर तपासली. आणि त्याला नव्या स्वरुपात स्वीकारण्याचे धैर्य भारतीयांनी दाखविले आहे. या सांस्कृतिक वारसामध्ये, विचारात, मूल्यांमध्ये विज्ञाननिष्ठता आहे हे आपण विसरता कामा नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मुकुल कानिटकर यांनी लिहिलेल्या “बनाए जीवन प्राणवान” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे पीठाधीश श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी, प्रकाशक देवेंद्र पवार उपस्थित होते.
Officials busy in Games : जिल्हा परिषदेतील रिकाम्या खुर्च्यांनी केला हिरमोड!
मुख्यमंत्री म्हणाले, ‘संपूर्ण जगावर राज्य करण्याची भूमिका आपल्या संस्कृतीची नाही. आपल्या विचारांचे, सभ्यतेचे अनुकरण सर्वत्र व्हावे, यातून मानवता वाढावी, ही शिकवणूक आपली परंपरा देते. हजारो वर्षांपासून प्रगल्भतेने सिध्द असलेल्या संस्कृतीवर आपला देश उभा आहे. आपली सिंधु संस्कृती याचे दर्शन घडवते. सूमारे ९ ते १० हजार वर्षांपूर्वी असलेली सभ्यता आपण पहातो. याचे अवशेष आजही आपल्याला आढळतात.’
परिपूर्ण नगराचे स्वरुप त्याच्या अवशेषांमध्ये आपण पहातो. पाश्चिमात्यांकडे ज्या गोष्टी नव्हत्या, त्या आपल्याकडे होत्या. या समृध्द परंपरेला इंग्रजांनी डिलीट करण्याचा प्रयत्न केला. याला छेद कसा देता येईल, यासाठी इथल्या परंपरांवरही त्यांनी घाला घातला. आपण समृध्द होतो म्हणून आपल्यावर अनेक आक्रमणं झालीत. त्याही स्थितीत आपण त्यांचा सामना केला व संस्कृती टिकवून ठेवली, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
Divisional Commissioner of Amravati : विभागीय आयुक्तांचे पथक धडकले जिल्हा परिषदेत
वर्तनामध्ये सभ्य संस्कृती
सनातन परंपरा विवेकाच्या विचारातून, संवेदनेतून आलेली आहे. ज्यांनी धर्मशास्त्र वाचले नाही, अशा अनेक लोकांच्या वर्तनात या सभ्य संस्कृतीचा अंश पोहोचलेला आहे. एखाद्या परक्या ठिकाणी, नवीन गावात जर आपण जाऊ तर त्या ठिकाणची आपली माता – बहीण आपल्याला हातपाय धुण्यास सांगते. याचा अर्थ ती आपल्याला जेवणाला निमंत्रण देत असते. जेवणाअगोदर हातपाय धुण्याची ही कृती विज्ञाननिष्ठेच्या पूढे जाणारी असल्याचे अभिनव शंकर भारती महास्वामी म्हणाले.








