Breaking

CM Devendra Fadnavis : गृहमंत्र्याच्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा!

 

 

law and order in the home minister city is at stake : पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपी अद्यापही फरारच

nagpur –मध्यवर्ती कारागृहात घेऊन जाताना पोलिसांच्या वाहनातून उडी घेऊन पळ काढणारा कुख्यात गुंड अजय बोरकर अद्याप फरारच आहे. गुन्हे शाखा आणि जरीपटका पोलीस, धंतोली पोलीस बोरकरचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाल्यामुळे जरीपटका पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. आरोपी पळाल्याप्रकरणी तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. गृहमंत्र्याच्या शहरात वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रियता वारंवार दिसून येत आहे त्यामुळे गृहमंत्र्याच्या शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जरीपटका इंदोरा चौकातील कुख्यात गुन्हेगार अजय बोरकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे तब्बल नऊ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करण्यात आले. तेथून मध्यवर्ती कारागृहात नेण्यासाठी जरीपटका पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार कमलेश यादव, अमित चवरे, तुषार पडोळे हे पोलीस वाहनातून जात होते.

रहाटे कॉलनी चौकात सिग्नल बंद असल्यामुळे पोलीस वाहनाची गती कमी झाली. त्याचवेळी आरोपी अजय बोरकर याने पोलिसांना गुंगारा देऊन वाहनातून उडी घेऊन पळ काढला. पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच परिसरात शोधाशोध केली. मात्र कुख्यात असलेला अजय बोरकर यांनी पोलिसांना गुंगारा देऊन अंधारात पळ काढला. मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी अजय बोरकर ला नेण्यात येत होते. पोलीस वाहनात एवढा कुख्यात गुंड असूनही पोलीस पोलीस त्याच्या बाबतीत गाफील होते.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एखाद्या गुन्हेगाराने चक्क पोलिसांच्या वाहनातून पळ काढल्यामुळे पोलिसांच्याही कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे कुख्यात अजय बोरकर हा पळाला की त्याला पोलिसांनीच पळून लावले असाही संशय निर्माण झाला आहे. आरोपी पळून गेल्यानंतर कारवाईच्या भीतीपोटी पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देण्याचे टाळले. मात्र,आरोपी सापडत नसल्याचे बघून ठाणेदार आणि पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांना याबाबत माहिती देण्यात आली. याप्रकरणी धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर पोलीस दलाची प्रतिमा मलीन

जरीपटका पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी चक्क पोलीस वाहनातून उडी घेऊन पडून गेला. आणि वाहना त चार पोलीस कर्मचारी असतानाही त्यांना तो आरोपी सापडत नाही. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुख्यात गुन्हेगार पळून गेल्यामुळे नागपूर शहर पोलीस दलाची प्रतिमा सुद्धा मलिन झाली आहे. त्यामुळेच तिन्हीही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.