Inauguration of the office of Shahitya Sammelan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास; कार्यालयाचे उद्घाटन
New Delhi नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनाची जगात चर्चा होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन निश्चित भव्य असे होईल. हे संमेलन देश नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांकरीता अभिमानास्पद ठरेल. साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
Child labor law : बालकामगार कायदा केवळ कागदावरच; उपाययोजना अपयशी !
या संमेलनासाठी महाराष्ट्र शासन पाठीशी असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत मराठी साहित्यिक उत्साही आहेत. हे संमेलन विचारप्रर्वतक ठरेल. या साहित्य संमेलनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दिल्लीतील मराठी मंडळाच्यावतीने सत्कार
दिल्लीतील विविध मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दिल्लीत अनेक वर्षांपासून राहत असलेल्या मराठी लोकांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. दिल्लीतील मराठी मंडळांसाठी आणि येथील वास्तुंसाठी योग्य पाऊल उचलले जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
MoS Pankaj Bhoyar : गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यमंत्र्यांचा सीसीटीव्हीवर भर
पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन?
दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे संमेलन तालकटोरा मैदानावर होणार असले तरीही उद्घाटन सोहळा मात्र विज्ञान भवनात होण्याची शक्यता आहे. तालकटोरा स्टेडियम येथे संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.