Instructions to speed up waste treatment plant at Bhandewadi : मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुसबिडी कंपनीला सुनावले
Nagpur भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचरा प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि प्रक्रियेची क्षमता वाढवून समाधानकारक प्रगती दर्शवावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसबिडी कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेला दिले. त्याचवेळी सुसबिडी कंपनीला अखेरची मुदत मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, नाहीतर करार रद्द करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी कंपनीला दिला.
मुख्यमंत्र्यां ‘रामगिरी’ या शासकीय निवास्थानी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल आणि सुसबिडी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Nagpur Municipal corporation : महापालिकेची तक्रार करायची आहे? बिनधास्त करा!
नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी येथील ३९ एकर जागा सुसबिडी (सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीला कचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता देण्यात आली आहे. आता कंपनीद्वारे प्रायोगिक तत्वावर बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
नजीकच्या काळात पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल, असे सुसबीडी कंपनी चे प्रोजेक्ट मॅनेजर नितीन पटवर्धन यांनी सांगितले. याप्रसंगी उपायुक्त विजय देशमुख, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, सुसबिडी च्या श्रीमती वृंदा ठाकुर, वित्त संचालक विनोद टंडन, सल्लागार राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
नाहीतर करार रद्द करू
भांडेवाडी येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मेपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही तर करार रद्द करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या लोकांना दिला. मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याची चांगलीच चर्चा झाली.