Mahastride will provide direction for the development of the state : मुख्यमंत्र्यांना विश्वास, पाच वर्षात राज्याचा ‘जीएसडीपी’ ४५ लाख कोटींवर
Nagpur राज्याच्या विकासाकडे आपण अभ्यासपूर्ण दृष्टीने जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की गत दहा वर्षात आपण ३० लाख कोटी रुपयांची वाढ साध्य केली आहे. या एकूण ४५ लाख कोटी जीएसडीपीमध्ये केवळ सात जिल्हे ५० टक्क्यांपर्यंत जीएसडीपी तयार करतात. महास्ट्राइड हा उपक्रम राज्याच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मिहान येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या अर्थात आयआयएम सभागृहात महास्ट्राइड प्रकल्पाचा प्रातिनिधिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, उपाध्यक्ष राणा जगजीतसिंग पाटील, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जागतिक बँकेचे मारचीन पियाट्कॉस्की आदी उपस्थित होते.
Zilla Parishad School : ४५० शाळांमधील CCTV च्या प्रस्तावाचे काय झाले?
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून २०१३-१४ पर्यंत आपला जो जीएसडीपी होता तो १५ लाख कोटींपर्यंत पोहोचला. २०१३-१४ पासून ते २०१९-२० पर्यंत तो २९ लाख कोटींपर्यंत पोहोचला. गेल्या पाच वर्षांचा जर विचार केला तर तो ४५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘ऑपरेशन सिंदूर ही लुटुपुटुची लढाई’
असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मित्र ही संस्था महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा हा एक मोठा विकास रथ होऊ शकते. ही चळवळ होऊ शकते. मित्रच्या माध्यमातून नव्या महाराष्ट्राची उभारणी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.