Breaking

CM Devendra Fadnavis : सर्वाधिक हत्याकांडात गृहमंत्र्यांचे शहर राज्यात तिसरे !

Mumbai and Thane have the highest number of murders in the state after that Nagpur : राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबई-ठाण्यात; नागपूर, पुणेही आघाडीवर

Nagpur राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. परिणामतः गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले. तसेच हत्याकांड आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबईमध्ये घडले आहेत. दुसऱ्या स्थानावर माजी मुख्यमंत्र्यांचे शहर असलेले ठाणे आहे. तर तिसऱ्या स्थानावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर नागपूर आहे. त्यापाठोपाठ पुणे शहराचा नंबर लागतो. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरील आकडेवारीतून हे सिद्ध झाले आहे.

राज्यात गेल्या वर्षभरातील गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक हत्याकांडाच्या घटनांमध्य वाढ झाल्याचे दिसते. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र आहे. तसेच राज्य पोलीस दलातील वाढता भ्रष्टाचार आणि अनेक गुन्ह्यात आरोपींना चक्क पोलिसांचाच आशीर्वाद असल्याचे समोर आले. हत्याकांडाच्या बाबतीत राज्यात टोळीयुद्ध, कौटुंबिक हिंसाचार, प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधासह जुने वैमनस्यातून सर्वाधिक हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे.

Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा सरकारला घरचा आहेर !

राज्यात सर्वाधिक खुनाच्या घटना मुंबईत घडल्या आहेत. मुंबईत वर्षभरात १०१ हत्याकांडाच्या घटना घडल्याचे उघडकीस आले. यामध्ये सर्वाधिक खून वैमनस्य आणि टोळीयुद्धातून झाल्याची माहिती समोर आली. हत्याकांडाच्या घटनांमध्ये दुसऱ्या स्थानावर माजी मुख्यमंत्र्याचे शहर ठाण्याचा क्रमांक लागतो. ठाण्यात ९६ हत्याकांड घडले आहेत. त्यात जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातील तब्बल २६ हत्याकांडांचा समावेश आहे.

तिसऱ्या स्थानावर गृहमंत्र्याचे शहर नागपूरचा क्रमांक लागतो. नागपुरात ९१ हत्याकांड घडले आहेत. चवथ्या क्रमांकावर पुणे शहर आहे. पुण्यात ८७ हत्याकांड घडले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये ८१ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्या नव्याने निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीवर वर्चस्व ठेवण्यासाठी गुन्हेगार प्रयत्न करतात. याच कारणातून गुन्हेगांरांमध्ये टोळीयुद्ध घडत आहेत. टोळीयुद्धातसुद्धा अनेक हत्याकांड राज्यात घडलेल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांची भीती राहिली नाही
राज्यातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रभावी वापर करणे अपेक्षित आहे. गुन्हेगारांची वारंवार तपासणी करणे, गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे देखील व्हायला हवे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा व ‘एमपीडीए’नुसार कारवाई करून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न इत्यादी कामावर पोलिसांचे लक्ष हवे. मात्र, सध्या राज्य पोलीस दलावर राजकीय दबाव आणि पोलिसांमधील भ्रष्ट प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे पोलिसांवर गुन्हेगार वरचढ भरत आहेत.

टोळीयुद्ध-अनैतिक संबंधांच्या घटना जास्त
राज्यातील सर्वाधिक हत्याकांड घडण्यासाठी टोळीयुद्ध, अनैतिक संबंध या घटना कारणीभूत ठरल्या आहेत. संपत्ती आणि पैशाचा वाद, एकतर्फी प्रेमसंबंध हेही मुख्य कारण ठरल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक कारणातून घडलेल्या हत्याकांडातील आरोपींमध्ये प्रियकर, नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.