Raj Thackeray is a friend; Uddhav Thackeray is not an enemy : मुख्यमंत्र्यांनी दिली दिलखुलास उत्तरे; जिव्हाळा पुरस्कार प्रदान
Nagpur राजकीयदृष्ट्या अडचणीच्या प्रश्नांची उत्तरं देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशिष्ट प्रकारचं चातुर्य वापरतात. शुक्रवारी रात्री नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिली. त्यांना उद्धव की राज आणि शिंदे की पवार? असे दोन प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ‘राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत, पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत’, हे फडणविसांच्या तोंडून ऐकताच टाळ्याही पडल्या आणि हशाही पिकला.
नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ संपादक तथा विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde आणि अजित पवार DCM Ajit Pawar महायुती सरकारमध्ये फडणविसांचे सख्खे साथीदार आहेत. या दोघांपैकी कुणावर अधिक विश्वास आहे, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी बॅलन्स साधला. ‘अजित पवार मुरलेले राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी माझी व्हेवलेंथ छान जुळते. तर एकनाथ शिंदे यांच्याशी माझी आधीपासूनच मैत्री आहे,’ असे उत्तर फडणविसांनी दिले.
Beed incident impact : जिल्ह्यात गावगाडा थांबला; सरपंच, सदस्यांचे कामबंद आंदोलन !
माझ्या कुटुंबानेही सहन केले
संयम, सहनशिलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली आहे. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक पध्दतीने मला अपमानीत करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मी शिकलो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाची संधी मला मधल्या काळात मिळाली होती. तेव्हा मुख्यमंत्री पद स्वीकारले नाही. बाहेर राहूनच आपण चांगले काम करु, असा माझा त्यावेळी समज होता. परंतु सत्ताबाह्य राहून कामे करण्यापेक्षा सत्तेत उपमुख्यमंत्री राहून काम करणे योग्य आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे आदरापोटी ती जबाबदारी स्वीकारली, याचाही त्यांनी उल्लेख केला. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला. असे एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.
Nagpur Improvement Trust : काय सांगता? नासुप्रची इमारत पाडणार ?
माझे व पत्नीचे ठरले आहे…
माझी मुलगी प्रचंड समंजस आहे. कधीकधी तिच्या उत्तरांनी मी सुद्धा स्तब्ध होतो. राजकारणापलिकडे जाऊन ती साऱ्या बाबी पाहते याचे मला प्रचंड समाधान आहे. आमच्या संसारात मी आणि माझी पत्नी आम्ही एक तत्व पाळलं आहे. ज्याला जे आवडतं ते केलं पाहिजे. हे विचारस्वातंत्र्य आम्ही सन्मानाने जपतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.