Special meeting for akola airport expansion : मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती; खासदारांचा पाठपुरावा
Akola राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी विशेष बैठक घेतली. या बैठकीत अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या भूसंपादनाशी संबंधित अडचणींचा आढावा घेण्यात आला. खासदार अनुप धोत्रे यांनी पाठपुरावा केला होता.
बैठकीत कोल्हापूर, कराड, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कोणताही प्रकल्प केवळ भूसंपादनाअभावी रखडू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी वेळेत व समन्वयाने काम करावे.
CM Devendra Fadnavis : नागपुरातील ४२६ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना हक्काचे घर!
अकोल्याचे खासदार अनुप भाऊ धोत्रे यांनी अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊन अडचणी दूर करण्याचे आदेश दिले. या बैठकीला अकोला (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर हेही उपस्थित होते.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणीपुरवठ्याची ऐशीतैशी!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना अकोला विमानतळ प्रकल्पातील अडथळे दूर करून तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विमानतळाचा विस्तार हा अकोला जिल्ह्याच्या दृष्टीने आर्थिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ही बैठक अकोला जिल्ह्यासाठी सकारात्मक बदल घडवणारी ठरणार असून, विमानतळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गती येण्याची अपेक्षा आहे.