Breaking

CM Devendra Fadnavis : कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावल्यास याद राखा!

 

Strict action will be taken if law and order is violated : कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा; गृह विभागाच्या चर्चेला विधानसभेत उत्तर

Mumbai महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य आहे. शांतता आणि सौहार्दासाठी आपले राज्य ओळखले जाते. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा. सरकार कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. विधानसभेत अर्थसंकल्पातील गृह विभागावरील मागण्यांवरील चर्चेला त्यांनी उत्तर दिले.

महाराष्ट्रातील शांतता कुणीही भंग करू नये. कुणी तसा प्रयत्न केला, तर त्याला सोडण्यात येणार नाही. नागपुरातील घटनेत पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

एखादी घटना घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर कारवाई करीत गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी शासन कार्य करीत आहे. सर्व गुन्हेगारी प्रकारांमध्ये राज्य देशात आठव्या क्रमांकावर आहे. शहरांमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीत देशात पहिल्या पाच क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही. एकूण गुन्हेगारी मध्ये 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 2 हजार 586 गुन्ह्यांनी घट झाली आहे, असा दावाही त्यांनी केला

CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT

पूर्वी अत्याचाराची नोंद करण्यासाठी महिला पुढे येत नव्हत्या. मात्र समाजमन बदलत आहे. महिला त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविषयी बोलू लागल्या आहेत. स्वतःहून पुढे तक्रारी नोंद करीत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी उपयोजना करण्यात येत आहे. पोलीस घटक स्तरावर महिला सहाय्यक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष महिलांसाठी समर्पित आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

डायल ११२ मध्ये मदत मागितल्यास तातडीने महिलांना मदत देण्यात येत आहे. या क्रमांकाचा प्रतिसाद वेळ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असंही ते म्हणाले. लहान मुलांच्या शोधासाठी राज्यामध्ये ऑपरेशन मुस्कान उपक्रम राबविण्यात येत आहे. अशा पद्धतीने १२ उपक्रम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

CM Fadnavis at Patanjali Food Park : फडणवीस मुख्यमंत्रीपदी नसल्याने फूड पार्क रेंगाळला?

Operation Black Face
लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबतीत बऱ्याच तक्रारी समोर आले आहेत. अशा प्रकारचे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ फोटो व साहित्य विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोधून ते काढून टाकण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फेस सुरू करण्यात आलेले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.