Taj hotel to open in Nagpur : मुख्यमंत्र्यांचा अनोखा पुढाकार, हॉटेल सुरू होणार
Nagpur मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे हॉटेल एकदा पाहण्यासाठी बरेच जण मायानगरीत जातात. मात्र ताज हॉटेलला नागपुरातच पाहण्याची व अनुभवण्याची संधी नागपुराकरांना प्राप्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. नागपुरातदेखील ताज समूहाचे हॉटेल उभे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खुद्द इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनित चटवाल यांनीदेखील ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. ताज समूहाच्या वांद्रे येथील नवीन ‘ताज बँड्स स्टँड’ या भव्य हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (१० फेब्रुवारी) झाले. नागपुरातही ताज हॉटेल उभारले जाणार आहे. त्यासाठीचा सामंजस्य करारही झाला आहे, अशी गुड न्यूज यावेळी इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांनी दिली.
Rajendra Shingne, Shashikant Khedkar : विधानसभेत पराभूत उमेदवार मैदानात एकत्र!
नागपुरात आम्ही ताजला मिस करतो. तेव्हा तुम्ही नागपुरात येण्यासंबंधीची घोषणा आजच करा, असे आवाहन फडणवीस यांनी भाषणात केले. त्यावर चटवाल यांनी ताज नागपुरात उभारले जाणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.
मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. वांद्रे परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे, पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे हे हॉटेल भविष्यात मुंबईची एक नवी ओळख निर्माण करेल.
Local Body Elections : राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोइंग वाढले
टाटा समूह आणि विशेषतः ताज हॉटेल्सचा भारताच्या विकासात मोठा वाटा आहे. ताज हे केवळ एक हॉटेल नसून, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. विसाव्या शतकातील कुलाब्यातील ताजप्रमाणे, एकविसाव्या शतकातील हे हॉटेल नवे प्रतीक ठरेल. असे मुख्यमंत्री म्हणाले. जर ताज हॉटेल नागपुरात उभारले गेले तर येथील लॉजिस्टिक्सला मोठे बळ मिळेल व त्याचा फायदा येथे नवीन उद्योगधंदे तसेच गुंतवणूक येण्यास नक्कीच मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत.