Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळेच ‘ वाघनखं ‘ भारतात !

The credit for bringing Waghnakh to India goes to Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले श्रेय

Nagpur राज्याचे तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले, पाठपुरावा केला त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून भारतात येऊ शकली, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्या कार्याचा उल्लेख केला. मध्यवर्ती संग्रहालयात (अजब बंगला) शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, पोस्ट मास्टर जनरल (नागपूर परिक्षेत्र) शोभा मधाळे, मुधोजीराजे भोसले आदींची उपस्थिती होती.

Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक कार्याची पुन्हा होतेय आठवण !

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनच्या संग्रहालयातून भारतात आणली गेली. हे महान कार्य तत्कालीन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हातून घडले. त्यांच्याच कल्पक बुद्धीतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यशस्वी झाले, याचा उल्लेख गेल्या पंधरा दिवसांपासून वारंवार होतोय. स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजलखानाचा कोथळा महाराजांनी याच वाघनखांनी बाहेर काढला होता.

मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून महाराष्ट्रात आणण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच पूर्ण केला. ते लंडनमध्ये गेले, तेथील सरकारसोबत सामंजस्य करार केला. त्यानंतर भारतातील शिवप्रेमींसाठी वाघनखं भारतात पाठविण्याचा तेथील सरकारने निर्णय घेतला होता. ती वाघनखे आज (शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी) नागपुरात दाखल झाली.

Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे आणखी एक फलीत

या कार्यक्रमात शिवकालीन शस्त्रे या माहिती पुस्तिकेचे तसेच वाघनखावर आधारित विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले. मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उद्घाटन झाले. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार होण्याची नागपूरकरांना ही अपूर्व संधी मिळाली आहे. वाघनखे ही महाराष्ट्राच्या शौर्याचा मनबिंदू आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी वाघनखांचा चपखल वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी प्रयत्नपूर्वक ही वाघनखे महाराष्ट्रात आणली आहेत. महाराष्ट्रातील हजारो युवक या शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनातून प्रेरणा घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.