The government is trying to produce international quality players from tribal community : आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल
Nagpur राज्याचा आदिवासी विभाग आणि आश्रमशाळांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरु आहेत. आदिवासी मुलांसाठी राज्यशासनाने नामांकित शाळांची योजना विस्तारीत केली. त्यांना चांगल्या शाळांमध्ये शिकण्याची सोय करून दिली. स्वयम् योजनेच्या माध्यमातून वसlतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागू नये यासाठी उत्तम कार्य सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Nitin Gadkari : टॉयलेट बांधण्यासाठीच परवानगी घेणे बाकी राहिले आहे
आदिवासी विकास विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
‘आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातारवण, तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देण्याचा प्रयत्न आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवासायीक खेळाडू घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राबवायच्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे,’ असंही ते म्हणाले.
Nagpur Municipal Corporation : रुग्णालयांच्या शेजारीच वाहतेय सांडपाणी!
फडणवीस म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी समाजातील खेळाडुंनी धनुर्विद्या, ॲथलॅटिक्स आणि देशी खेळांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. निसर्गाचे रक्षक असणाऱ्या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य् शासनाने विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे. ही शक्ती अधिक वेगाने निर्माण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल.