Variable Energy Cyclotron Center to be set up in Nagpur : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; कॅन्सर रुग्णांवरील उपचारासाठी महत्त्वाचा निर्णय
Nagpur नागपूर आता हेल्थ हब होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मेडिकल आणि मेयोचा कायापालट करण्यात येत आहे. एम्सवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांचं लक्ष आहे. NCI च्या माध्यमातून कन्सरवर अद्ययावत उपचार होत आहे. अशात आता कॅन्सर रुग्णांवरील उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पार्टीकल ॲक्सीलरेटर (कण त्वरक) तंत्रज्ञान पूर्वी संशोधनासाठी मर्यादीत होते. आता ती कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचारासह शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखासह एक सामाजिक गरज झाली आहे. भारतातील सद्यस्थितीत अवघे 24 सायक्लोट्रॉन केंद्र कार्यान्वित आहेत. पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत विचार करता आणखी एक हजार केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे नागपुरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
Vijay Wadettiwar Harshawardhan Sapkal : काँग्रेसची महाराष्ट्रातील सूत्रं विदर्भाकडेच!
नागपूर येथील वैद्यकीय व अभियांत्रिकी पायाभूत संस्था उपलब्ध आहेत. त्यामुळे सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृतीगट स्थापन निर्देशही त्यांनी दिले. याचबरोबर या प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेबाबत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना सांगितले. नागपूर येथे सायक्लोट्रॉन केंद्राच्या उभारणीबाबत फडणवीस यांच्या अध्यक्षतेत रामगिरी या शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल,प्रो.किशोर भूरचंडी, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, आयजीएमसीचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाण, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे संचालक वैद्यकीय संचालक डॉ.आनंद पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर उपस्थित होते.
Kailas Vijayvargiya : बंगालमधील मदरशांमध्ये देशविरोधी शिक्षा दिली जाते !
नागपूर मध्ये व्हीएनआयटी, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या नावाजलेल्या पायाभूत संस्था उपलब्ध आहेत. यादृष्टीने विचार करता हे केंद्र नागपूरसह मध्यभारताला मोठी उपलब्धी ठरेल. या केंद्राद्वारे क्लीन एनर्जी, जलशुद्धीकरण, आरोग्य, ऊर्जा अन्य प्रक्रिया सारख्या औद्योगिक क्षेत्राची नवी दालने सक्षम होण्यास मदत होईल, असे एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले.