Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘अभिजात साहित्याच्या प्रचाराला AI चा पर्याय’

 

AI is alternative to the promotion of classics literature : तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

Pune आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीतील आपले अभिजात साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार करणे आवश्यक आहेय. यादृष्टीने चॅट-जीपीटीसारखे Chat-GPT एखादे ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ Small Language Model तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा. कारण अभिजात साहित्याच्या प्रचारासाठी कृत्रीम बुद्धिमत्ता हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे येथे तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

फर्ग्यूसन महाविद्यालय Fergusson College येथे संमेलनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य व्यासपीठावर हा कार्यक्रम झाला. प्रमाण मराठीच्या माहेरघरी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन होत आहे. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पुढील महिन्यात पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे, ही देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे मराठी माणूस पोचलेला नाही. दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे गेलो असता तेथील एका चिमुरड्याने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे सुंदर गीत गायले. मराठी माणूस इतक्या वर्षापासून परदेशात गेला तरी माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही, हे बघून अभिमान वाटला, असं मुख्यमंत्री म्हणाले