Breaking

CM Devendra Fadnavis : ‘उडता नागपूर’च्या दिशेने उपराजधानीची वाटचाल!

 

Drug trafficking increased in Nagpur : गृहमंत्र्यांच्या शहरात पोलिसांचे दुर्लक्ष; अंमली पदार्थांची तस्करी वाढली

Nagpur काही वर्षांपूर्वी पंजाब राज्यामध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर ‘उडता पंजाब’ नावाचा सिनेमा आला होता. राज्यातील तरुण कसा ड्रग्सच्या आहारी गेला आहे, हे त्यात दाखविण्यात आले होते. महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूरमध्येही आता नशेखोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहराची ओळखही काही वर्षांमध्ये ‘उडता नागपूर अशी झाली, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही.

राज्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. गृहमंत्र्याचे शहर तस्करीचे केंद्र बनले आहे. गेल्या वर्षभरात उपराजधानीतून जवळपास ३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. यामध्ये २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीच्या एमडी पावडरचा समावेश आहे. पोलिसांनी ११७ आरोपींना अटक करुन अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे जाळे तोडले आहे.

Right to Education : १ हजार २९१ विद्यार्थी ठरतील आरटीईचे लाभार्थी!

पूर्वी उपराजधानीत गांजाची चोरुन विक्री होती होती. ‘एमडी ड्रग्ज’ केवळ नावापुरतेच विकल्या जात होते. मात्र, आता उपराजधानी अंमली पदार्थ विक्रीचे ‘हब’ झाले आहे. तस्करांनी मुंबईनंतर नागपूरलाच प्राधान्य दिले आहे. तस्करांनी अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, बार-रेस्ट्रॉरेंट, हुक्का पार्लरमधील युवा पीढी आणि पबमधील तरुण-तरुणींना अंमली पदार्थांचे व्यसन लावले. तरुणांना एमडी अगदी सहज मिळेल अशी व्यवस्था केली.

Nagpur Collectorate : शेतकऱ्यांना मिळणार ‘युनिक फार्मर आयडी’

नायजेरियातून नागपुरात
नायजेरीयातून आलेली एमडी थेट गोवा-मुंबईतून नागपुरात येत आहे. अनेकदा ड्रग्स तस्करांच्या जाळ्यात पोलीस कर्मचारीसुद्धा अडकले आहेत. पैसे कमविण्याच्या नादात काही पोलीस कर्मचारी ड्रग्स तस्करांशी हातमिळवणी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी अंमली पदार्थ ५३ ठिकाणी कारवाई केली. गुन्हे शाखेने (एनडीपीएस) १९ एमडी तस्करांवर सापळा कारवाई करीत २ किलो ६७७ ग्रॅम एमडी जप्त केली.

शहरातील कुख्यात कुख्यात गुन्हेगारांचा कल ‘एमडी’ विक्री आणि तस्करीकडे वाढला आहे. खंडणी, खून, अपहरण, बलात्कार अशा गुन्ह्यातील गुन्हेगारसुद्धा एमडी विक्रीकडे वळले आहेत. त्यात मकोकाचा आरोपी सुमित चिंतलवार, पवन ऊर्फ मिहिर मिश्रा, राणू खान, भुरु शेख, राकेश गिरी, गोलू बोरकर, अक्षय वंजारी, सागर चौधरी, अफसर अंडा अशा गुन्हेगारांचा समावेश आहे. तब्बल ३२ गुन्हेगारांवर ड्रग्ज विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.