Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून नागपूरकरांना दिलासा!

नागपूर

Krushna Khopde, Pravin Datke on action mode : कृष्णा खोपडे, प्रवीण दटके ॲक्शन मोडवर!

BJP भाजपचे पूर्व नागपूरचे NAGPUR आमदार कृष्णा खोपडे हे दणदणीत विजयानंतर परत सक्रिय झाले आहेत. नागपूरकर करदात्यांना दिलासा मिळावा हा मुद्दा त्यांनी मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील अभय योजनेला Abhay Yojna मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्व थकीत करधारकांना एकूण दंडावर 80 टक्के सूट मिळणार आहे.

नागपूर महानगर पालिका NMC अंतर्गत थकीत मालमत्ता करधारकांना पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कृष्णा खोपडे व प्रविण दटके यांनी पुढाकार घेतला होता. अभय योजना पुन्हा सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. मुख्यमंत्री महोदयांनी यासंदर्भात तात्काळ सज्ञान घेऊन 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत अभय योजना राबविण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.

यासंदर्भात 31 डिसेंबर रोजीच आदेश निर्गमित झाले व 1 जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता कर, पाणी बिल, बाजार विभागाचा देखील समावेश असणार आहे. थकबाकीदारांना लागणाऱ्या एकूण दंडावर 80 टक्के सूट देण्यात येईल. या योजनेमुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून महानगरपालिकेच्या तिजोरीत देखील भर पडेल. जास्तीत जास्त नागपुरकरांनी या योजनेचा लाभ घ्यावा व मार्चपूर्वीच आपली पाटी कोरी करून घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी आमच्या विनंतीला मान राखल्याचे समाधान असल्याची भूमिका खोपडे व दटके यांनी मांडली आहे.

मंत्रिमंडळाची घोषणा होण्यापूर्वी खोपडे यांचे नाव नागपुरातून चर्चेत होते. सर्वाधिक फरकाने निवडणूक जिंकणारे आणि लोकसभेत पूर्व नागपूरमधून भाजपला सर्वाधिक आघाडी देणारे नेते म्हणून कृष्णा खोपडे यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्यांना किमान राज्यमंत्रीपद तरी मिळेलच, अशी आशा होती. पण तसे झाले नाही. मात्र तरीही खोपडे पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच कामाला लागले आहेत, हे विशेष.