Ladki Bahin website is down : प्रशासनाची माहिती ; मुदतीत अर्ज करूनही साडेसात हजार अर्ज प्रलंबित
Nagpur लाडकी बहीण योजना आणून महायुती सरकारने नवा गेम खेळला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजुने झुकलेला कल आपल्याकडे पलटवला. योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात आले. याच लाडक्या बहिणींनी अख्खी निवडणूक महायुतीच्या नावावर केली. जबरदस्त बहुमत घेऊन महायुती सरकार पुन्हा स्थापन झाले. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्याच गृहजिल्ह्यात लाडक्या बहिणींचे साडेसात हजार अर्ज पेंडिंग आहेत. आणि संकेतस्थळही बंद पडले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ८६ हजार १८३ लाभार्थांना लाभ मिळाला. मात्र अद्यापही मुदतीत अर्ज केलेल्या ७ हजार ४४९ बहीणी प्रतीक्षेत आहेत. आमच्या अर्जांचे काय झाले, याची विचारणा त्यांनी प्रशासनाकडे केली. तर योजनेसाठीचे संकेतस्थळच बंद असल्याचे उत्तर दिले जात आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीचीच सरकार आल्याने योजनेचा निधी वाढवून मिळेल, अशी अपेक्षा बहीणींना लागली आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.
जाहीरनाम्यात १५०० रुपयांची रक्कम वाढवून २,१०० रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे संकेतस्थळ अपडेट करण्याचे काम सुरू असल्याची शक्यताही प्रशासनातील काहींनी व्यक्त केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ योजनेसाठी पात्र सर्व महिलांना मिळावा या दृष्टीने राज्य शासनाने या योजनेला सुरुवातीला ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर ही मर्यादा १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती.
Nagpur Police : बुलेटच्या सायलेंसरवर पोलिसांनी रोलर फिरवला !
रेशन कार्ड असणाऱ्यांना उत्पान्नाच्या दाखल्याची गरज नसल्याने योजनेचा लाभ घेण्यामागील मोठा अडसर दूर झाला. योजनेसाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली. मुदतीत अर्ज केल्याने आमच्या अर्जांसाठी प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींनी केली.