The tourist accommodation in Navegaon Bandh will be the attraction : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
विदर्भातील गोंदिया Gondia जिल्ह्यामधे एमटिडीसीचे MTDC नवेगाव बांध पर्यटक निवास पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्पाच्या भोवती ते उभारले आहे. पर्यटक निवास हे पर्यटकांसाठी एक उत्तम पर्वणी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवेगाव बांध लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्प 1975 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. हे घनदाट जंगल गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे. गोंदियापासून 65 कि.मी. अंतरावर नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. येथील तलाव व वनक्षेत्र पक्षांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे सैबेरियासारख्या अतिदूर प्रदेशाहून विशिष्ट हंगामात पक्षी येतात. नवेगांव बांध हा तलाव सुमारे 11 वर्ग कि.मी. परिसरात पसरलेला आहे.
Nagpur Zilla Parishad : फक्त व्याजातून मिळाले सव्वासात कोटी !
या तलावाच्या मध्यभागी प्रेक्षणीय असे ‘मालडोंगरी’ बेट आहे. या जंगलाचा भाग हा नागझिरा अभयारण्यापासून सुरु होतो. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून थेट छत्तीसगढपर्यंत जातो. हा जंगलप्रदेश हत्तींचा येण्या-जाण्याचा मार्ग होता. म्हणूनच नागझिरा अभयारण्यातील हत्तीखोदरा व नवेगांव अभयारण्यातील हत्तीपंगडी या ठिकाणांना तशा प्रकारची नावे मिळाली, असे म्हटले जाते.
Nagpur RTO : चारशे रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्याला अटक !
नवेगाव बांध हे एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. जिथे बोटिंगची व्यवस्था आहे. पक्षी निरीक्षणाची शक्यता आहे. आसपासच्या जंगलातील विविध प्राणी पाहू शकता. येथील प्राचीन आणि शांत वातावरण पर्यटकांना निसर्गाच्या जवळ आणते. आता पर्यटक निवासमुळे या अभयारण्यात येणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.