Local Body Elections in four months : मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत; शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष बळकटीसाठी मोहीम
Akola भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील संकेत दिले आहे. ते बघता भाजप पाठोपाठ आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडूनही पक्ष बांधणीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राजमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त अकोला शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. १० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
दोन्ही पक्ष नेतृत्वांकडून आगामी निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, निवडणूक स्थानिक असल्याने वेळेवर काय होईल, हे सांगता येत नसल्याने पक्षवाढीसाठी दोन्ही बाजंनी प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती याकडे कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून पाहिले जाते.
Prataprao Jadhav : पॅकेजिंग, मार्केटींग व ब्रँडींगवरही भर द्या
दरम्यान रविवारी गौरक्षण रोडवर अकोला महानगर शिवसेनेच्यावतीने राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर त्याच ठिकाणी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अश्विन नवले, श्रीरंग पिंजरकर, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषा विरक युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल ठाकूर युवा सेना जिल्हाप्रमुख नितीन मानकर, रमेश गायकवाड, अॅड. पप्पू मोरवाल आदी होते.
Workers get diarrhea due to contaminated water : दूषित पाण्यामुळे शंभर कामगारांना अतिसाराची लागण
फक्त चार महिन्यांचा वेळ
विधानभा निवडणुकीत पाचपैकी केवळ एकाच बाळापूर मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा उमेदवार होता. हा उमेदवारही ऐनवेळेवर भाजपमधून आयात करावा लागला. या मतदारसंघात स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाला होती. मात्र शिंदे गटाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकांवर फेकला गेला होता. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा आणखी कस लागणार आहे. त्यासाठी तयारी करण्याकरता आणखी चार महिने मिळणार आहे