Breaking

CM Fadnavis at Patanjali Food Park : फडणवीस मुख्यमंत्रीपदी नसल्याने फूड पार्क रेंगाळला?

Fadnavis said, Baba Ramdev was waiting for me to become the Chief Minister : मुख्यमंत्र्यांनीच केला खुलासा; रामदेव बाबांना हसू आवरले नाही

Nagpur नागपुरात फूड पार्क सुरू करण्यासाठी काही वर्षांपूर्वी बाबा रामदेव यांच्या पतंजली समुहाला नागपूर एमआयडीसीमध्ये भूखंड हस्तांतरित करण्यात आला. परंतु त्यानंतर त्यावर काहीच घडले नाही. यामागचे कारण आज उघडकीस आले आहे. ‘मी मुख्यमंत्री होण्याची रामदेव बाबा वाट बघत होते,’ असे सांगून आपण मुख्यमंत्री नसल्याने पतंजली समुहाने या प्रकल्पाला चालना दिली नाही, असा अप्रत्यक्ष गौप्यस्फोट खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

नागपुरात प्रति दिन ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या पतंजली फूड व हर्बल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. पतंजली उद्योग समुहाला काही वर्षांपूर्वीच फूड पार्कसाठी जवळपास ४०० एकर जागा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या जागेवर भूमिपूजन सुद्धा त्यावेळी झाले होते. परंतु पुढे गाडी सरकत नव्हती. या काळात महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले. हे सरकार अडीच वर्षे टिकल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात सत्तांतर झाले. महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आले खरे. परंतु, मुख्यमंत्रीपदी फडणवीस नव्हे तर एकनाथ शिंदे होते.

Devendra Fadanvis : शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उभारी आणणारा प्रकल्प सुरू केलाय !

पतंजलीला भूखंड मिळूनही नागपुरात फूड पार्क का उभारला जात नाही, असा सवाल सर्व स्तरातून केला जात होता. यामागचे कारणही समोर येत नव्हते. त्यामुळे फूड पार्क तयार करण्याच्या पतंजली समुहाच्या एकूणच इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह लावले जात होते. परंतु आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच या कारणाचा पर्दाफाश केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘फूड पार्कला उशिर झाला आहे. परंतु हा उशिर मी मुख्यमंत्री नसल्यामुळे झाला आहे. आता मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर बाबा रामदेव यांनी फूड पार्कच्या कामाला गती दिली.’ यावेळी बाबा रामदेव यांनी दोन्ही हात वर करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्याला दाद दिली. त्यांना हसुदेखील आवरले नाही.

Shakti Peeth Highway : समृद्धी नागपुरातून तर शक्तीपीठ सुरू होणार सेवाग्राममधून

विशेष म्हणजे हा फूड पार्क निर्माण होण्याचे कारण सांगताना आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनामुळे वेळ लागत असल्याचे काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या खुलाश्याने आचार्य बालकृष्ण यांचे विधान खोटे पडत असल्याचे दिसून येत आहे. पतंजली फूड व हर्बल पार्क सुरू होण्यास उशिर होण्याचे कोणतेही कारण असो परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आल्यानंतरच या पार्कचे आज उद्घाटन झाले.