Breaking

CM Relief Fund : शाहिस्ताला डोळ्याचा कर्करोग, वेळेवर मदत मिळाली अन् प्राण वाचले

 

Shahista had eye cancer, doctor saved her life : मुख्यमंत्री सहायता निधीतून सहकार्य; डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

Amravati डोळ्याच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रासलेल्या शाहिस्ता परवीन या महिलेचे प्राण मुख्यमंत्री सहायता निधी, हरिना फाउंडेशनचे सहकार्य आणि डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया झाली. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे शाहिस्ताची दृष्टी तर वाचलीच, पण तिचे प्राण वाचविण्यातही डॉक्टरांना यश आले.

शाहिस्ता परवीन या अमरावती शहरातील रहिवासी आहेत. त्यांना डोळ्याच्या गंभीर कर्करोगाचे निदान झाले होते. परिस्थिती इतकी बिकट होती की, डोळा काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता. यामुळे त्यांच्या जीवनालाच धोका निर्माण झाला होता. कुटुंबीयांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संपर्क साधल्यानंतर विभागाचे अध्यक्ष डॉ. श्याम गावंडे यांनी तत्काळ पुढाकार घेत ₹७५,००० ची मदत उपलब्ध करून दिली.

Devendra fadnavis : लोणीकर तुम्ही चुकलेच, मुजोर वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी फटकारले!

याशिवाय, नेत्रदान आणि नेत्रचिकित्सा जनजागृती करणाऱ्या हरिना फाउंडेशनने ₹२५,००० ची अतिरिक्त मदत दिली. या संयुक्त प्रयत्नांमुळे २८ मे रोजी डॉ. रोहित मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. कर्करोगाची गाठ यशस्वीरित्या काढून रुग्णाचा डोळा आणि दृष्टी दोन्ही वाचवण्यात आली. ९ जून रोजी रुग्णाला घरी सोडण्यात आले.

Heavy rains in Buldhana : डोणगावमध्ये पाच शेतकरी पुरात अडकले; बचावकार्य प्रगतीपथावर

समन्वयातून यशस्वी उपचार रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत, शासन, वैद्यकीय तज्ज्ञ आणि समाजसेवी संस्थांचा प्रभावी समन्वय यामुळेच रुग्णावर वेळेवर उपचार शक्य झाल्याचे नमूद करण्यात आले.

डॉ. गावंडे यांचे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष गरजू रुग्णांसाठी सदैव तत्पर असून, अशा सेवांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. श्याम गावंडे यांनी केले.