Successful preparations for the arrival of Sahakar Dindi :
Buldhana केंद्र शासनाने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील सर्व पतसंस्थांची सहकार परिषद महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने दिनांक ०९/०२/२०२५ रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी, नागपूर येथून एक सहकार दिंडी शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे. या दिंडीचा प्रवास बुलढाण्यातून होणार आहे.
या परिषदेत राज्यभरातील पतसंस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विदर्भातील सर्व पतसंस्थांची सहकार दिंडी नागपूर येथून निघाली आहे. या दिंडीचे वर्धा, अमरावती, यवतमाळ मार्गे बुलडाण्यात ३१ जानेवारीला आगमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या उत्सवात बुलडाणा जिल्हा कुठेही मागे राहू नये यासाठी सर्व पतसंस्था दिंडीमधे सहभागी होणार आहेत.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचे वाशिम बसस्थानकात आंदोलन
३१ जानेवारीला सकाळी श्री गजानन महाराज मंदीर, डोणगांव रोड, मेहकर येथे पोहोचणार असुन तेथुन ही सहकार दिंडी जिल्हयातील मेहकर, चिखली, बुलडाणा, देऊळगांवमही व देऊळगांव राजा मार्गे शिर्डी येथे जाणार आहे. यासाठी जिल्हयातील ज्या-ज्या पतसंस्थांकडे स्वतःची वाहने किंवा रुग्णवाहीका आहेत अशा सर्व संस्थांनी आपापल्या वाहनांसह मेहकर येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Collector of Buldhana : ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटेल
जिल्हयातील पतसंस्थांचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी व कर्मचारी यांनीही सहभागी व्हावे. दिंडीत सहभागी होणा-या सर्व वाहनांवर आपापल्या संस्थांचे नावाचे व उपक्रमांचे बॅनर्स लावावे. जिल्हयातील पतसंस्थांच्या सर्व वाहनांची / चित्ररथाची ही दिंडी मेहकर शहरातील मुख्यरस्त्यावरुन फीरुन चिखली शहरात येईल. संध्याकाळी ६ वाजता बुलडाणा येथे येईल व चिखली रोडवरील साई लॉन्स् येथे सर्व वाहनांची व दिंडीसोबत उपस्थित सर्वांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.