Breaking

codeofconduct : हुंड्याऐवजी मुलीसाठी फिक्स डिपॉझिट, फाजील खर्चाला फाटा

Maratha community’s marriage code of conduct announced : मराठा समाजाची ‘ लग्न आचारसंहिता’ जाहीर

AhilyaNagar : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजात खळबळ माजली. लग्नसमारंभातील फाजील खर्च, बडेजाव, आणि हुंड्याच्या वाढत्या प्रथेवरून समाजात विचारमंथन सुरू झालं. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील मराठा समाजाने एक पुरोगामी आणि ठोस निर्णय घेत समाजाच्या परिवर्तनाची दिशा ठरवणारी ‘ लग्न आचारसंहिता’ जाहीर केली आहे.
या आचारसंहितेचा उद्देश हुंडा, खर्चिक प्रथा, आणि अनाठायी अवडंबराला आळा घालण्याचा आहे. ‘मराठा लग्न आचारसंहिता संमेलन २०२५’ या विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. संमेलनाला ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Devendra Fadnavis : संत्रा उन्नती प्रकल्पाचे काय? आठ वर्षांनंतरही फक्त वचनपूर्तीची प्रतीक्षा!

या आचारसंहितेनुसार, आता हुंडा घेणे-देणे पूर्णपणे निषिद्ध ठरवण्यात आले आहे. त्याऐवजी वधूपित्याने मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच लग्नात प्री-वेडिंग फोटोशूट किंवा व्हिडीओ दाखवण्यावर बंदी घालण्यात आली असून, असा प्रकार आढळल्यास समारंभातील पाहुण्यांनी उठून निघुन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा लग्न आचारसंहितेतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
लग्नसोहळा १०० ते २०० लोकांमध्ये मर्यादित ठेवावा.
प्री-वेडिंग फोटोशूट किंवा व्हिडीओ लग्नात दाखवू नये. दाखवल्यास पाहुण्यांनी उठून जावे. लग्न नेहमी वेळेवर लावावे, उशीर टाळावा.डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, लोककलावंतांना संधी द्यावी. कर्ज काढून लग्न खर्च करू नये. कर्जामुळेच अनेक आत्महत्या झाल्याची नोंद आहे.

Maharashtra politics : एकनाथ शिंदेंनी उठाव केलाच नसता, पण…

नवरदेवापुढे मद्यपान करून नाच करणाऱ्या मंडळींना रोखावे.हार घालताना नवरा-नवरीला उचलू नये. फेटा केवळ वधू आणि वराच्या वडिलांनीच बांधावा. पाहुण्यांसाठी फेटा आणि इतर सत्कार बंद करावेत.लग्न, वाढदिवस, उद्घाटनप्रसंगी फक्त पुस्तके, झाडांची रोपे किंवा रोख स्वरूपातच आहेर द्यावा.सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू इ. देखाव्याचा भाग असलेले प्रकार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊ नयेत.
या आचारसंहितेला केवळ नियमांची चौकट न मानता, समाजातील मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे, कोकणातील काही समाजांमध्ये याआधीच हुंडा, मानपान, देणीघेणी यांना फाटा देण्यात आलेला आहे आणि आता मराठा समाजानेही त्याच दिशेने एक निर्णायक पाऊल उचललं आहे.

Dancebar case : तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय? ‘ कोहिनूर’चा हिशेब सांगा !

मराठा समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी यावेळी “ना आम्ही हुंडा घेणार, ना देणार” असा निर्धार व्यक्त केला. ज्या कुटुंबात महिलांचा छळ होतो किंवा हुंडा घेतला जातो, अशा कुटुंबांशी रोटी-बेटी व्यवहार न करण्याचा ठाम निर्णयही या संमेलनात घेण्यात आला.
या आचारसंहितेमुळे मराठा समाजात एक नवा आदर्श निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हुंडा आणि खर्चिक लग्नांमुळे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक तणाव निर्माण होतो. अशा पार्श्वभूमीवर हा पुढाकार अत्यंत स्वागतार्ह आणि अनुकरणीय ठरतोय अशी भावना व्यक्त होत आहे.

___