Cultural festival inaugurated by District Collector Dr. Kiran Patil : सांस्कृतिक महोत्सवाचा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
Buldhana : महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा, शारीरिक तंदुरुस्ती राखावी आणि कलागुणांना वाव द्यावा, यासाठी महसूल विभागाच्यावतीने दोन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, महसूल प्रशासन हा शासनाचा कणा आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्यस्त आणि तणावग्रस्त कामातून विरंगुळा मिळण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव महत्त्वाचा आहे. यातून कर्मचारी खेळ आणि कलागुण सादर करून जिल्ह्याचे नाव उंचावतील.”
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर यांच्यासह महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
महोत्सवाचा प्रारंभ राष्ट्रीय मतदार दिनाच्या शपथविधीने झाला. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि पथसंचलन झाले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी क्रिकेट खेळून स्पर्धेची सुरुवात केली.
Promotion of industries : जिल्ह्यात उद्योगांना चालना, गतवर्षात उद्योग वाढले !
स्पर्धांमधील सहभाग
जिल्ह्यातील महसूल उपविभागीय कार्यालये आणि कर्मचारी विविध खेळांमध्ये सहभागी झाले. क्रिकेट, कबड्डी, थ्रोबॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे महोत्सवाचे मुख्य भाग होते.
महोत्सवाचे महत्त्व
अपर जिल्हाधिकारी श्री. शेलार यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले, “क्रीडा स्पर्धा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने सहभाग नोंदवून सहकाऱ्यांनाही प्रेरणा द्यावी.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसीलदार वृशाली केसकर आणि ग्रामविकास अधिकारी शिवानंद वाकदकर यांनी केले. या महोत्सवामुळे महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मैत्रीपूर्ण वातावरणात आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली.
Female wrestlers : राज्यभरातील २०० महिला पहेलवानांमध्ये झुंज सुरू !
सातही उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग
या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालय, बुलढाणा, मलकापूर, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद या महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, थ्रो-बॅाल, खो-खो, रिंग टेनिस, व्हॅालिबॅाल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दीबळ, कॅरम या खेळाचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग असणार आहे.