Breaking

Collector of Akola : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ तयार !

A ‘war room’ for speedy execution : योजनांच्या जलद अंमलबजावणीसाठी उचलले पाऊल

Akola विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणे. योजनांची प्रभावी व जलद अंमलबजावणी करणे. प्रलंबित कामांबाबत तत्काळ उपाययोजना करणे. आदी कामांसाठी ‘जिल्हा वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. फ्लॅगशिप व महत्वाच्या 14 योजनांचा नियमित आढावा याद्वारे घेतला जाणार आहे.

जिल्ह्यात शासनाकडून राबविण्यात येणा-या योजना प्रभावीरीत्या राबवणे. उद्दिष्टे वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. नियमित आढावा घेणे. आवश्यक उपाययोजना करून अडथळे दूर करणे. आणि अंमलबजावणीला गती देणे आदी कामकाज या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे. विविध विभागांशी समन्वय साधण्यासाठी कक्ष समन्वयक म्हणून हेमंत रवींद्र जामोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

योजनांची व्यापक अंमलबजावणी करून दैनंदिन प्रगती होणे अपेक्षित आहे. त्यानुसार विविध योजनांचा प्रगती अहवाल जिल्हा वॉर रूम समन्वयकांमार्फत नियमित सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

Economic census : यवतमाळ जिल्ह्याची होणार आर्थिक गणना !

या योजनांसाठी नियोजन
प्रधानमंत्री जलजीवन मिशन, शहरी व ग्रामीण सर्व आवास योजना, प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी, स्वच्छ भारत मिशन, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर व बांबू लागवड योजना, प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा महाअभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार, गुड गव्हर्नन्स इंडेक्स, आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल, ॲग्रीस्टॅक महाराष्ट्र आदी योजनांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.

प्रशासकीय कारभारावरच भागणार?
अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्याची प्रतिक्षाच आहे. पण प्रशासकीय कारभार सुरू आहे. पालकमंत्री येतील आणि मग काम सुरू होईल, याची प्रतिक्षा न करता आता प्रशासनच कामाला लागले आहे. त्यामुळे भविष्यात जे पालकमंत्री येतील त्यांचे काम सोपे झालेले आहे.