Strict action will be taken to stop illegal businesses in Melghat : मेळघाटमधील अवैध व्यवसाय रोखण्यासाठी कठोर पाऊल, पालकमंत्र्यांकडे आली होती तक्रार
Amravati गेल्या काही दिवसांपासून मेळघाटमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः अवैध मासेमारी, वृक्षतोड यासह अमली पदार्थांचे रॅकेट देखील या परिसरात असल्याचे गेल्या काळात उघडकीस आले आहे. यासंदर्भात आता कठोर पाऊल उचलले जाणार आहे. हा प्रकार रोखण्यासाठी गरज भासल्यास तडीपारीची कारवाई करायला मागेपुढे बघणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मेळघाटात वाघाच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या तक्रारीवर तातडीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. प्रभुदास भिलावेकर यांनी याबाबत निवेदन दिले होते. वन कायद्यानुसार सर्व परवानग्या घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Nitin Gadkari : गडकरींच्या जनता दरबारात ‘ऑन दि स्पॉट’ निकाल!
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागरिकांनी सादर केलेल्या तक्रारी व निवेदनांवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सुनावणी घेतली. यामध्ये तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. तसेच काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. यामध्ये मेळघाटमधील प्रश्नही उपस्थित करण्यात आले.
मेळघाटमध्ये खासगी प्रवासी बससेवेची स्थिती प्रादेशिक परिवहन विभाग तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांची रूपरेषा तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी एकूण २० तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.
Illegal Sand mining : खडकपूर्णात अवैध रेती उपशावर कारवाई, तीन बाेटी उडवल्या
प्रमुख तक्रारी आणि दिलेले निर्देश
पर्यावरण शपथ: सर्व शाळांमध्ये पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यासाठी निर्देश जारी करण्याचा निर्णय.
असदपूर बुडीत क्षेत्र: येथील व्यावसायिकांसाठी नव्या जागेची उपलब्धता करण्यास शासनस्तरावर मार्गदर्शन घेण्यात येणार.
बस सेवा: असदपूर-अमरावती बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी विभाग नियंत्रकांना सूचना देण्यात येणार.
फ्रेजपूरा अतिक्रमण: याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील कार्यवाही.
हनुमान मंडळ लिज प्रकरण: नोंदणीकृत ट्रस्टद्वारे अर्ज केल्यास जिल्हास्तरावर लवकर कार्यवाही करण्यात येणार.