Prison inmates should get basic facilities : जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांची केली पाहणी
Buldhana जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त निधीतून बुलढाणा जिल्हा कारागृह येथे विविध विकासकामे सुरु आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व अपर जिल्हाधिकारी शेलार यांनी कारागृहास भेट दिली. तसेच कारागृहातील कैद्यांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात कुठलीही कसर सोडू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कैद्यांकरिता नवीन मुलाखत कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. निर्माणाधीन असलेला व्हिसी कक्ष, पाकगृह, दोन प्रार्थना भवन याचीही पाहणी केली. त्यानंतर सर्कल विभागातील बरॅकची पाहणी करुन कैद्यांशी संवाद साधला. तसेच कारागृहाव्दारे कैद्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. यामध्ये कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे, व्हिडीओ कॉलिंग सुविधा, ॲलन व्हिडीओ सुविधा, ग्रंथालय, विधीसहाय्य, अल्पमुदतीचे विविध प्रशिक्षण तसेच शेती व वृक्षलागवडी याचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी यांच्या भेटी दरम्यान कारागृहातील कैद्यांनीनी विविध सांस्कृतीक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारागृहात राबविण्यात येऊ शकणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. कारागृहातील बंदी कारागृहातुन मुक्त झाल्यानंतर त्यांच्या पुर्नवसानसाठी बंद्यांनी व कारागृह प्रशासनाने करावयाची उपाययोजना संदर्भात चर्चा केली. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधुन प्राप्त नवीन रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पूजन केले. ही नवीन रुग्णावाहिका कारागृहास प्रदान करण्यात आली.
Ashish Shelar : यावर्षीपासून साजरा होणार आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव !
कार्यक्रमा प्रसंगी कारागृह अधीक्षक संदिप भुतेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, तुरुंगाधिकारी मोहन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शुभम देशमुख तसेच सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.