The use of drones will ease the worries of farmers : जिल्हाधिकाऱ्यांना विश्वास; जिजामाता महाविद्यालयात ड्रोन प्रात्यक्षिक
Buldhana फवारणीसाठी ड्रोनचा वापर करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शेतकऱ्यांची मजुरांची चिंता तर मिटेलच शिवाय स्वावलंबी शेतीचा मार्गही मोकळा होऊ शकतो. त्यामुळे ड्रोन हे शेतकऱ्यांसाठी भविष्यात वरदान ठरू शकते, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचालित जिजामाता महाविद्यालयात प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या कृषी उपयोगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृणाल कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले.
Ex-MLA Rahul Bondre : लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार
या प्रात्यक्षिकाचा उद्देश शेतकऱ्यांसमोरील मजूर टंचाई आणि औषध फवारणीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करणे हा होता. ड्रोनच्या वापरामुळे श्रमांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते, वेळ वाचतो. आणि कीटकनाशक फवारणी अधिक कार्यक्षमतेने केली जाते. खरीप आणि रब्बी हंगाम तसेच फळबागांवर ड्रोनचा वापर रोग नियंत्रण आणि पीक व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
DPC Meeting : पालकमंत्र्यांची नियुक्ती लांबली; विकासकामे रखडली!
आधुनिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा उद्देश बाळगून हे आयोजन करण्यात आले. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी बुलढाणा, यांनी कृषी विभागाला जिजामाता महाविद्यालयाच्या विस्तृत मैदानावर हे प्रात्यक्षिक आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने 25 जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात कॉनफ्लाय डायनॅमिक्सचे कृणाल कस्तुरे, निलेश बाहेकर, कोमल शेळके, आणि प्रताप राजपूत यांनी ड्रोन प्रात्यक्षिक सादर केले.
Mahayuti Government : सरपंचांचा ‘मान’ वाढला, ‘धन’ कधी मिळणार?
यावेळी शेतकरी कुटुंबातील बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई आणि बुलढाणा तहसीलचे निवृत्त नायब तहसीलदार प्रकाश डब्बे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
ड्रोनच्या किंमती, शासकीय अनुदान, आणि तांत्रिक मार्गदर्शनासाठी शेतकरी आणि इच्छुक व्यक्तींना चिखली रोडवरील राज संभाजी टॉवर येथील कॉनफ्लाय डायनॅमिक्सच्या कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेची मोठी बचत होऊ शकते आणि औषधांचे समप्रमाणात फवारणी केल्याने पिकांवरील प्रभावी नियंत्रण शक्य होते.
यामुळे उत्पादकता वाढण्यासोबतच उत्पादनाचा खर्चही कमी होतो. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. या प्रात्यक्षिकामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांच्या या संयुक्त उपक्रमामुळे कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा दाखवत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.