Tribal Pardhi Delegation Meets District Collector Under the Leadership of BJP MLA Dr. Ashish Deshmukh : शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन तत्पर
Nagpur : काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात आदिवासी पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेतली. या समाजातील अवैध धंद्यांकडे वळलेल्या लोकांना वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी शासन प्रशासनासह समाजानेही तत्पर असणे महत्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी इटनकर यावेळी म्हणाले. कोणत्याही अवैध प्रकारचा मार्ग हा अधोगतीकडे नेणारा असतो. जागृत समाजाचे ते लक्षण नाही, असेही ते म्हणाले.
तिडंगी येथील अवैध दारू व्यवसायाकडे वळलेल्या लोकांना त्यांच्या आवडीनुरूप विधायक मार्ग मिळावे, स्वयंरोजगार मिळावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजना लाभधारकांच्या गरजेनुरूप कशा देता येतील, याचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने नियोजन करण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Vijay Wadettiwar : त्याच्या मानगुटीवर हिंदुत्वाचं भूत बसलंय !
एखादा नवा व्यवसाय निवडताना लाभधारकाचा पसंतीक्रम आवश्यक असतो. त्यांना शेळी पालनात रस असेल तर अशा लोकांसाठी शेळीपालन आणि इतरांना वेगळा व्यवसाय दिला पाहिजे. कुटीर उद्योसासह आदिवासी शबरी योजना आणि इतरही योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. यासाठी तिडंगी येथे एक स्वतंत्र शिबिर घेण्याचेही निर्देश देण्यात आले.
Chandrashekhar Bawankule : कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात, अन् ती आम्ही करणारच !
महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून विविध योजना तिडंगी येथे आदिवासी पारधी समाजाच्या घराघरांत पोहोचल्या पाहिजे, यासाठी शिलाई मशीन व इतर योजना प्रभावीपणे प्रशासनाने राबवाव्या, अशा सुचना आमदार आशिष देशमुख यांनी यावेळी दिल्या. जिल्यात ४२ ठिकाणी असलेल्या आदिवासी पारधी वस्त्यांवर विशेष शिबीर घ्यावे, असेही आमदार देशमुख यांनी यावेळी सुचवले.