Breaking

Confusion in administration : एकाच दिवशी, एकाच पदासाठी दोन आदेश !

Is this the beginning of a latent conflict between the Chief Minister and Deputy Chief Minister :मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुप्त संघर्षाची नांदी?

Mumbai : राज्य सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. बेस्ट महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारासाठी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे, हे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून स्वतंत्रपणे काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनात गोंधळ निर्माण झाला असून, शासनाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गोंधळाची सुरुवात झाली बेस्ट महाव्यवस्थापकाच्या अतिरिक्त कार्यभारावरून. नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार आश्विनी जोशी यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आला. तर, दुसरीकडे सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांना हाच अतिरिक्त कार्यभार दिला आहे. एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन अधिकारी नियुक्त केल्याने कोणत्या आदेशाचे पालन करायचं, असा पेच अधिकाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

Adivasi Pardhi Development Council : घोसपुरीत पारधी समाजाच्या गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण !

या प्रकारामुळे केवळ प्रशासनातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेच्या केंद्रबिंदूंवरून सुसंवादाऐवजी स्पर्धा सुरू असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सत्ताकेंद्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी शीतयुद्ध सुरू असल्याचे संकेत यानिमित्ताने समोर आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या दिल्लीतील वाढत्या गाठीभेटी, भाजपच्या निर्णय प्रक्रियेमध्ये होणारी भूमिका, आणि शिवसेना गटातील अस्वस्थता यामुळे हा पेच अधिक गहिरा झाला आहे. या पार्श्वभूमीवरच आता अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेला गोंधळ हा केवळ व्यवस्थेतील तांत्रिक चूक नाही, तर उच्च पातळीवरील वर्चस्व संघर्षाचं प्रतिबिंब असल्याचं जाणकार सांगतात.

Maratha movement : अंतरवली मारहाणीमागे फडणवीसच; 29 ऑगस्टला मुंबई धडकणार !

एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांकडे कार्यभार सोपवणं म्हणजे शासकीय व्यवस्थेतील एक गंभीर विसंगती आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे, या दोन्ही आदेशांना जबाबदार असलेले विभाग थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे ही चूक अचानक झाली आहे असे वाटण्यापेक्षा उद्देशपुर्ण वाटत असून, येत्या काळात या संघर्षाचा परिणाम प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर आणि आगामी राजकीय समीकरणांवरही होण्याची शक्यता आहे.

________