Congress spokesperson Atul Londhe criticizes BJP leaders for being busy in felicitating : आज अमरावतीत भाजप नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा
Mumbai : जम्मू – काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची निर्घृणपणे हत्या केली. देशभर दुखवटा पाळला जात आहे. हे देशावर आलेले मोठे संकट आहेत. अशा दुःखद प्रसंगात कसे वागले पाहिजे, याचे भान भाजप नेत्यांना राहिलेले नाही. देश दुःखात असताना भाजप नेते नागरी सत्कार करवून घेत आहेत. हे करताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
अमरावतीमध्ये आज (२६ एप्रिल) भाजप नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यावरून अतुल लोंढे यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, पहलगाम येथील हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. लोकांमध्ये भीती आहे, रोष आहे. अशा दुःखद प्रसंगात भाजपचे नेते, मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत. हे संताप आणणारे कृत्य आहे.
Atul Londhe : गुन्हा दाखल होऊनही लोंढे थांबले नाहीत, पुन्हा घेतला फडणवीसांशी पंगा !
अमरावतीमध्ये आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा सत्कार शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. मुळात हे आयोजन करतानाच भाजप नेत्यांना लाज वाटायला हवी होती. पहलगाम येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटक ठार झाले. त्यांच्या चितेची राखही अजून विझलेली नाही. बरेच पर्यटक अद्याप महाराष्ट्रात परतलेले नाहीत. मृतांचे कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अशा परिस्तितीत भाजप नेत्यांचे सत्कार सोहळे चीड आणणारे आहे.
Atul Londhe : धर्माच्या नावाखाली भांडणे करणाऱ्या देशात गुंतवणूक येत नसते !
राम शिंदे संविधानिक पदावर आहेत. देशावर दुःखाचे सावट असताना त्यांना सत्कार सोहळ्यामध्ये हार तूरे घेणे शोभते का ? नाही जनाची तर निदान मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे. लोकांच्या दुःखाशी भाजप नेत्यांना काहीही देणेघेणे नाही, असेच त्यांच्या या कृत्यावरून दिसून येते, असेही अतुल लोंढे म्हणाले.