Breaking

Congress BJP काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सत्कार !

Congress Zilla Parishad passed a resolution of public felicitation of CM Fadnavis : जिल्हा परिषदेने केला जाहीर सत्काराचा ठराव

Congress Nagpur काँग्रेसची सत्ता असलेली नागपूर जिल्हा परिषद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करणार आहे. त्यांच्यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचाही जाहीर सत्कार होणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव संमत करण्यात आला. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याच्या काँग्रेसच्या मागणीलादेखील भाजपने पाठिंबा दर्शविला.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच त्यांचा जाहीर सत्कार करण्याबाबतचा ठराव विरोधी पक्षनेते आतिष उमरे यांनी मांडला होता.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल यांच्याशी चर्चा करावी. त्यांची वेळ घेऊन सत्कार कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार आहे. हा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी दिला. सदस्यांनी बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा पहिलाच निर्णय शेतकरी हिताचा!

माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता आली. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठे यश मिळाले. परंतु विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यात भाजपच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता आली. सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशात काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याचे पडसाद जिल्हा काँग्रेसमध्ये उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच सभेत भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती कुंदा राऊत यांनी हा ठराव मांडला. डॉ. सिंग यांनी संकटाच्या काळात देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे काम केल्याचे कुंदा राऊत म्हणाल्या. विरोधी पक्षनेते आतिष उमरे यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. एकमताने हा ठराव पारित करण्यात आला.