Those who betray the Congress will continue to wander : काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा माजी आमदार कोरोटे यांच्यावर निशाणा
Amgao काँग्रेसमध्ये मोठे होऊन पक्षाशी गद्दारी करणारे आता स्वार्थासाठी काँग्रेसला सोडून अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्याला प्रलोभन देऊन आपल्यासोबत नेण्यासाठी आग्रह करीत आहेत. परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार नाहीत व कोरोटे यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पक्षाशी गद्दारी करणारे भटकत राहणार आहेत, या शब्दांत माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी माजी आमदार सहसराम कोरोटे यांच्यावर निशाणा साधला.
आमगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बन्सोड होते. तर खासदार किरसान यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला अनेक नेते आपल्या स्वार्थासाठी सोडून गेले. पण जे सोडून गेले, ते भटकतच राहिले, असंही बन्सोड म्हणाले.
fake birth certificate case : जन्मदाखल्याच्या प्रकरणात मनसेचा गंभीर आरोप
काँग्रेस पक्ष सत्तेत नसला तरी मी वर्तमान खासदार आहे. कोणतीही समस्या असेल त्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी घाबरण्याची गरज नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागावे. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिला.
यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना काळे, जिल्हा सचिव इसूलाल भालेकर, जिल्हा परिषद सदस्य उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य छबू उके, बन्सीधर अग्रवाल, संपतलाल सोनी, जिल्हाध्यक्ष सेवा दल जमीलखान पठाण, गोंदिया काँग्रेस शहर अध्यक्ष योगेश बापू अग्रवाल, तालुका अध्यक्ष संजय बहेकार, शहराध्यक्ष देवकांत बहेकार मंचावर उपस्थित होते. संचालन जगदीश चुटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भोजराज जैतवार यांनी मानले.
Forest Department : वाघ, बिबट्याच्या २२ मिश्या, खवले मांजराचे दात जप्त !
कोरोटे काय म्हणाले होते?
मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. पण पक्षाने मला शेवटच्या क्षणापर्यंत अंधारात ठेवून माझा विश्वासाघात केला. यासर्व प्रकाराने मी प्रचंड व्यथीत झालो आहे, असा गंभीर आरोप आमगावचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी केला होता. त्याचवेळी २१ फेब्रुवारीला शिंदे सेनेत प्रवेश करीत असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान ऐनवेळी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला अंधारात ठेवले. माझे तिकीट कापून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली, असा आरोपही त्यांनी केला होता.








