Congress Levels Charges Against Ruling Front : मतांची चोरी सापडली, पण चोर अद्यापही फरार !

Vote Theft Exposed, But Thieves Still at Large : महाराष्ट्रात कायद्याच्या चौकटीत राहून केली मतांची चोरी

Nagpur : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप महायुतीने मतांची चोरी करून सत्ता मिळवली. मते चोरी झाल्याची बाब काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणली. त्याचे पुरावेही त्यांनी दिले. पण त्यानंतरही जनतेसोबत न्याय होत नाहीये. सत्ताधाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून मतांची चोरी केली. चोरी तर सापडली, पण चोर अद्याप सापडलेले नाहीत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकमधील अलंदचे आमदार व कर्नाटक राज्य धोरण व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील यांनी म्हटले आहे.

नागपुरातील दिक्षाभूमीतून निघालेल्या संविधान पदयात्रेचा समारोप काल (२ ऑक्टोबर) गांधी जयंती दिनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे झाला. त्यानंतर बी. आर. पाटील यांनी आज (३ ऑक्टोबर) नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे उपस्थित होते. यावेळी बी. आर. पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष सत्ता हाती ठेवण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा मुद्दा उघडकीस आणला. निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रारही केली. त्यानंतर जनतेसोबत न्याय होणे आवश्यक होते. पण निवडणूक आयोग अद्यापही चुप्पी साधून आहे.

Dussehra Gathering : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर तीन विचारांचा संगम !

कर्नाटकमध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हाही भाजपने मतांची चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अलंद मतदारसंघामध्ये परस्पर सहा हजार २९४ मते डिलिट करण्यात आली होती. ही बाब जेव्हा आमच्या लक्षात आली, तेव्हा आम्ही रिटर्निंग ऑफीसर ममता कुमारी यांच्याकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर काहीही कारवाई करण्यात आली नाही. तेव्हा मी स्वतः जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली त्यांनी सहाय्यक जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे या प्रकरणाची चौकशी सोपवली. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही.

Ladki Bahin Yojana : लिहून ठेवा.. लाडकी बहीण योजना बंद होणार !

काही काळानंतर या मत चोरी प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवण्याची मागणी केली. त्यानंतर सीआयडीने चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला १८ पत्रे लिहीली. पण त्याचे उत्तर आले नाही. त्यानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन जेथे जेथे मतांची चोरी झाली, त्याची माहिती दिली. त्यांनी पुरावेही सादर केले. ते बघून पत्रकारही दंग झाले होते. त्यांनतरही ढिम्म निवडणूक आयोगाने कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे आता एक तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयापुढे धरणे देणे किंवा न्यायालयाचा दरवाजा खटखटवणे, हो दोन मार्ग आमच्यासमोर असल्याचे बी. आर. पाटील यांनी सांगितले.