Congress movement : लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार !

 

Protest against BJP and Election Commission for stifling democracy : लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा करणार निषेध

Agitation in Maharashtra : भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा दाबला आहे. भाजपा व निवडणूक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष उद्या २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

आज ( २४ जानेवारी) पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने लोकशाहीचा गळा घोटला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजतानंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे निवडणूक आयोग देत
नाही.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचं भविष्य ‘हम दो – हमारे दो’, बावनकुळेंचे जोरदार प्रत्युत्तर !

 

राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही अशी जनभावना निर्माण झाली आहे. मतदान मतपत्रिकेवरच घ्यावे, अशी मागणी जनतेतूनच येत आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे, निवडणूका या निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पाडल्या पाहिजेत, यासाठी काँग्रेस राष्ट्रीय मतदार दिनी दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.उद्याच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार, खासदार, माजी आमदार खासदार, जिल्हा पदाधिकारी, विभाग व सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असेही नाना पटोले यांनी सांगितले.