Breaking

Congress MP Balwant Wankhede : महायुतीच्या घोटाळ्यांची पोलखोल करा!

Expose the scams of the Mahayuti Government : खासदार वानखेडे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन; दर्यापूरमध्ये आढावा बैठक

Amravati महायुतीमधील पक्षांनी विधानसभा निवडणुकीत चुकीच्या मार्गाने विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीबाबत जनतेच्या मनातही संतप्त भावना आहेत. अशात त्यांच्या घोटाळ्यांची पोलखोल करून महायुतीला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन खासदार बळवंत वानखेडे यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

दर्यापूर येथे शहर आणि ग्रामीण भागातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. यावेळी बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. दोघांनीही संघटन मजबूत करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. पण त्यासाठी प्रत्येक वॉर्ड आणि प्रभाग संघटनात्मकदृष्ट्या सक्षम ठेवून कामाला लागावे लागेल, असं बबलू देशमुख म्हणाले.

International Women’s day : कर्तृत्ववान महिलांचे ‘खणखणीत नाणे’!

‘ग्रामीण भागात काँग्रेसचे आजही वर्चस्व आहे. आगामी निवडणुकांमध्ये ते कायम ठेवून महायुतीला रोखण्याचे काम करावे लागेल. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या सर्वच स्तरांवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करणे हे आपले ध्येय आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असं आवाहन देशमुख यांनी केलं. महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या महाघोटाळ्यांचा पर्दाफाश करा, असंही ते म्हणाले.

One District One Crop : अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला भरारी!

या बैठकीला सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, सुनिल गावंडे, कांचनमाला गावंडे, गजानन जाधव, संजय बेलोकार, प्रदीप देशमुख, प्रभाकर कोरपे, राजू कराळे, नीतेश वानखडे, रफिक विजय विल्लेकर, साहेबराव भदे, चव्हाण, भदे, राजिक, जम्मूभाई पठाण, सुनिल डोंगरदिवे, आतिश शिरभाते, ईश्वर बुंदिले, जहिरभाई सौदागर, अनिल भारसाकळे, सागर देशमुख यांसह दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी (शहर व ग्रामीण), तालुका अल्पसंख्याक सेल, ओबीसी सेल, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, अनुसूचित जाती सेल, महिला काँग्रेस आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.