Congress Nash Nusarat : मानवतेचा खून, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !

Murder of humanity, Congress demands resignation of Home Minister : भारत देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश

Nagpur : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मुत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महिला काँग्रेसच्या गांधीसागर येथील कार्यालयासमोर कार्यकर्ते आणि नागरीक एकत्र जमले आणि मेणबत्त्या पेटवून दोन मिनीटे मौन पाळून शोक व्यक्त केला. हा हल्ला म्हणजे मानवतेचा खून आहे. या घटनेची जबाबदारी घेऊन देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे महिला काँग्रेसच्या बिहार राज्यातील कटिहारच्या प्रभारी नॅश नुसरत अली म्हणाल्या.

मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरीकही एकत्र जमले होते. यावेळी नॅश नुसरत अली म्हणाल्या, पहलगाम येथील दहशतवादी हल्ला म्हणजे मानवतेचा खून आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री आणि रक्षामंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. भारत देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे हे मोठे अपयश आहे. आपली गुप्तचर यंत्रणा इतकी कशी गाफील राहू शकते, असे म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

RTO Check Post : आंदोलनाच्या नावावर टोळक्याचा पिंपळखुटी चेक पोस्टवर उच्छाद, पोलिसही हतबल !

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले बव्हंशी लोक कुटुंबासह गेले होते. हल्ल्यामध्ये कुणाचे वडील, तर कुणाचा मुलगा मृत्युमुखी पडले. हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर खोऱ्यात सर्वत्र हाहाकार उडाला. या लोकांचा काय दोष होता, असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये रस्त्यांवर सुरक्षा व्यवस्था होती, असे पर्यटकांनी सांगितले. पण जेथे हल्ला झाला, तेथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. पर्यटन स्थळी सुरक्षा व्यवस्था न ठेवणे म्हणजे देशातीला नागरीकांच्या जिवाशी खेळ आहे, असेही नॅश नुसरत अली म्हणाल्या.

Dawwa Gampanchayat : डव्वा ग्रामपंचायतचा डंका, पंतप्रधानांकडून गौरव!

अब्दुल शकील, मोहसीन खान, मंगेश श्रीवास, गफार शेख, संजय दुधे, राकेश वैद्य, हाफिज पठाण, अब्दुल रफीक, नरेंद्र मोटखरे, अब्दुल हाफिज, इमरोज शरीफ, शेख अजीम, प्रमोद पराते, पापा अन्सारी, मेहुल अडवाणी, नईम शेख, लीना कटारे, राणी साळवे आदींची यावेळी उपस्थिती होती.