Whose interest is the sale of Yes Bank being considered : जापानी समितो बॅंकेला विकण्याच्या व्यवहाराची चौकशी करा !
Mumbai : बॅंकींग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी परवा परवाच काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात त्यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विश्वास व्यक्त केला होता की, उटगी आता बॅंकींग क्षेत्रातील घोटाळ्यांवर सरकारला सळो की पळो करून सोडतील. उटगी यांनी सपकाळांचा विश्वास सार्थ करून दाखवला आहे. काँग्रेसमध्ये सक्रीय होताच त्यांनी यस बॅंक विक्रीतील व्यवहार उजागर केला आहे.
काल (ता. ३०) मुंबईत गांधी भवन येथे यासंदर्भात उटगी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले सध्या यस बॅंक आर्थिकदृष्ट्या सुदृढ स्थितीत आहे. या बॅंकेत २,८५,००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. कर्जवाटप २,४८,००० कोटींचे आहे. गुंतवणूक पोर्टफोलिओ ८६,००० कोटींचा आहे. अशा चांगल्या स्थितीत असलेली येस बॅंक आरबीआय आणि केंद्र सरकार एका परदेशी बॅंकेकडे का सोपवत आहे? येस बॅंक ही एके काळी आर्थिक संकटात होती. पण आरबीआय व केंद्र सरकारने Too Big To Fail या संकल्पनेअंतर्गत बॅंकेला वाचवले आहे.
Local body Elections : आत्ता निघाले पक्ष मजबूत करायला, शक्य आहे का ?
जापानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बॅंक समितोमो मित्सुई बॅंकिंग कॉर्पोरेशनने अलिकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या Yes बॅंकेत सुमारे १३,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक केली. आता ५१ टक्के हिस्सेदारीसह Yes बॅंकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे. हा व्यवहार भारताच्या बॅंकिंग सार्वभौमत्वावर गदा आणणारा असून या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच ही बॅंक परदेशी बॅंकेच्या हाती जाऊ देऊ नये, अशी मागणी बॅंकींग क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक विश्वास उटगी यांनी केली आहे.