Breaking

Congress : काँग्रेस निरीक्षकांचा दौरा कशासाठी?

 

Signs of organizational changes in Buldhana District Congress : जिल्हा संघटनेत मोठ्या बदलाचे संकेत, जिल्हाध्यक्षही बदलणार?

Buldhana जिल्ह्यात एकेकाळी बळकटीचा गड समजल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाची आज वाईट अवस्था आहे. संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यभरात जिल्हा व तालुका काँग्रेस कमिट्यांमध्ये फेरबदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्ष निरीक्षक राजेंद्र राख यांचा तीन दिवसीय दौरा आजपासून बुलडाणा जिल्ह्यात सुरू झाला आहे.

गेल्या ६-७ वर्षांपासून राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष आहेत. ते पदावर कायम राहणार की नव्या चेहऱ्याला संधी दिली देणार, अशी चर्चा सुरू आहे. सलग दोन विधानसभा निवडणुकांमधील पराभव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव कमी होत चालल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे बोलले जाते. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांचा अंशतः प्रभाव असला, तरी त्यातही गटबाजीने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !

राजेंद्र राख हे ५ ते ८ एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. आज दुपारी १२.३० वाजता चिखली शहर व तालुक्याची बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात पार पडणार आहे.
सायंकाळी ४.३० वाजता बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची बैठक जिल्हा मुख्यालयात होईल.

MP Amar Kale : वाळूतस्करांना शासन-प्रशासनाचेच अभय

पुढील दौरा

७ एप्रिल: मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव विधानसभा
८ एप्रिल: मेहकर व सिंदखेडराजा विधानसभा

या दौऱ्यांमध्ये जिल्हा व तालुका कार्यकारिण्यांचे पुनर्रचनेचा मार्ग निश्चित होणार असून, बोंद्रे यांना पुन्हा संधी मिळेल की नवीन नेतृत्व उदयास येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.