Breaking

Vijay Wadettwar : अबू आझमींच्या निलंबनाच्या कारवाईला काँग्रेसचा पाठिंबा

Congress supports Abu Azmi’s suspension : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही ?

Mumbai : आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची बाजू घेत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे होते. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या कारवाईचा काळही वाढवला पाहिजे. सरकारच्या या कारवाईला आमचा पाठिंबा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांवर सरकार का कारवाई करत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Abu Azmi controversy : ठाकरे गट, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

अबू आझमी यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, औरंगजेब नालायक होता. त्याचे आणि अबू आझमी यांच्या वक्तव्याचे समर्थन कोणी करू शकत नाही. अबू आझमी यांच्यावर सरकारने कारवाई करावी, त्याला आमचे समर्थन आहे.

याप्रकरणी ठेका फक्त तुम्हीच घेतला का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही? त्यांना कोणाचा राजाश्रय आहे, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

 

Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे ‘मुह में राम आणि बगल में छुरी’!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोणीही केला तरी कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.

महाविकास आघाडीच्या आमदारांची निदर्शने..
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज (५ मार्च) महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली.

Dhananjay Munde, Manikrao Kokate : ‘महायुतीचे दोन गुंडे, कोकाटे-मुंडे’!

Dhananjay Munde, Manikrao Kokate : ‘महायुतीचे दोन गुंडे, कोकाटे-मुंडे’!

‘कोश्यारी ते कोरटकर, हरामखोर’, ‘शिवरायांच्या इतिहासाची पाने लाख
कोरटकरला महाराष्ट्र मारतोय लाथ’, कोरटकरला पुरवली सुरक्षा – राज्य सरकारला द्या शिक्षा’, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्याआमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच सरकार अशा लोकांना संरक्षण देतंय, याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.