Breaking

Vijay Wadettivar : वडेट्टीवारांचा मविआ नेत्यांना घरचा अहेर !

Conspiracy to pass the time in seat allocation The delay in seat allocation is definitely the reason behind the defeat : जागावाटपाला झालेला उशीर हे कारण पराभवामागे नक्कीच आहे

Nagpur Wadettiwar विधानसभेचे निकाल लागून दीड महिना उलटून गेला. तरी त्यातील राजकीय हेवेदावे व आरोप-प्रत्यारोप कायमच आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना शाब्दिक अहेर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जागावाटपात मविआच्या नेत्यांनी अकारण वेळ घालविल्यामुळे फटका बसला. यामागे काही षडयंत्र होते का, अशी शंका घेण्यास काहीच हरकत नाही, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वडेट्टीवार शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधानसभेला महाविकास आघाडीला फटका बसण्याची अनेक कारणे असली तरी जागावाटपाला झालेला उशीर हे कारणसुद्धा नक्कीच आहे. २० दिवस जागावाटपाचा घोळ कायम होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धवसेनेचे संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते. आम्हीसुद्धा होतो. परंतू, जागावाटपाचा तिढा जर दोन दिवसांत संपला असता तर १८ दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लानिंगसाठी उपयोगी पडले असते. परंतु जागावाटप अकारण लांबल्याने नियोजनाला वेळच मिळाला नाही.

MLA Ashish Deshmukh : सावनेरमध्ये गुंडागर्दीचे राजकारण खपवून घेणार नाही!

निवडणूकीसाठी तिन्ही पक्षांना संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारणे पुढे आली. त्यामुळे जागावाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका आम्हाला नक्की बसला. इतका वेळ घालवण्यामध्ये काहीतरी षडयंत्र होते का, असा सवाल मनात येत आहे. बैठकीची वेळ ११ वाजता असायची आणि अनेक नेते दोन वाजता यायचे. त्यात मी कोणाचे नाव घेणार नाही. पण यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला. एका जागेवर वारंवार त्याच त्या गोष्टी होत गेल्या.

MIHAN : ‘एमएडीसी’कडे कंपन्यांची अपडेटेड यादीच नाही !

कदाचित महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा घोळ दोन दिवसांत संपला असता तर आम्हाला नक्की फायदा झाला असता, असे वडेट्टीवार म्हणाले. आता वडेट्टीवार यांच्या या प्रश्नांमुळे मविआतील खदखद उघडपणे समोर आली आहे. याला राष्ट्रवादी व उद्धवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.