Constitution of India : संविधानाच्या ७५ कलमांवर ७५ तास चर्चा!

75 hours of discussion on 75 articles of the Constitution : १२५ नागरिकांचा सहभाग, गिनीज रेकॉर्डने घेतली नोंद

Nagpur संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात एक आगळेवेगळे अभियान पार पडले. ७५ वर्षांनिमित्त संविधानाच्या ७५ कलमांवर ७५ तास चर्चा करण्यात आली. नागपुरातील जागरूक नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल १२५ नागरिकांनी सलग ७५ तास ७५ कलमांवर चर्चा केली.

संविधान डिबेट्स वाचनाच्या ऐतिहासिक अभियानाचा समारोप झाला. भारतीय संविधानाच्या निर्मितीमागील वादविवादावर व त्याच्या अनुच्छेदावर सलग ७५ तास चर्चेचा देशातील हा प्रथमच कार्यक्रम होता. त्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डनेसुद्धा नोंद घेतली.

SP of Buldhana : पोलीस अधिक्षकांनी स्पष्टच सांगितले, ‘अवैध धंदे खपवून घेणार नाही’

सामाजिक न्याय विभाग, बार्टी आणि दिशा ह्युमन वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, कामठी रोड येथे ७५ तासांत संविधान डिबेट्समधील ७५ कलमांवर चर्चेचे वाचन आयोजित करण्यात आले होते. २३ मे रोजी संविधान डिबेट्स वाचनाला सुरुवात झाली.

भारतीय संविधान बनविताना २ वर्षे ११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला. त्यादरम्यान झालेल्या चर्चेचे केंद्र सरकारने इंग्रजी व हिंदीत कॉन्स्टिट्यूट असेंबली डिबेट्स प्रकाशित केले. त्या डिबेट्सचे मराठीत भाषांतर प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी केले. या तिन्ही भाषांतील कलमांच्या वादविवादाचे वाचन याप्रसंगी करण्यात आले.

या वाचनाच्या उपक्रमात बारा वर्षांच्या विद्यार्थ्यापासून तर सत्तर वर्षांच्या वयोवृद्धापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच वाचन मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत करण्यात आले. यात वकील, कॉलेज व अभ्यासिकेतील विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Mahavitaran : समस्या सोडवा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा!

समारोपप्रसंगी प्रा. देवीदास घोडेस्वार, मुख्य आयोजक वामन सोमकुवर, उत्तम शेवडे यांच्यासह शहरातील विविध संस्था, संघटनांंचे प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित झाले होते.