Concluding Ceremony to Be Held at Sevagram on Mahatma Gandhi’s Birth Anniversary : महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवाग्रामला होणार समारोपीय सभा
Nagpur : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वात आजपासून संविधान पदयात्रा सुरू झाली आहे. नागपूर येथील दिक्षाभूमी ते सेवाग्राम अशी ही पतयात्रा राहणार आहे. सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी ही पदयात्रा असल्याचे तुषार गांधी यांनी यावेळी सांगितले. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम येथे पदयात्रेची समारोपीय सभा होणार आहे.
या यात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते अनिल देशमुख, काँग्रेसचे आमदार व नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, सर्व ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना तुषार गांधी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दिक्षाभूमीतून यात्रेला सुरूवात करत आहोत. संविधानाचे संरक्षण आणि सबळीकरण आणि सत्याग्रह लोकांचा अधिकार या विषयावर भर देऊन आम्ही ही यात्रा काढली आहे.
Farmer’s Losses : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेगाव संस्थानही सरसावले !
यावेळी २ ऑक्टोबरला दसरा आहे. दसेच राष्ट्री स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाची सुरूवात करत आहे आणि याच दिवशी गांधी जयंती आहे. आता विटंबना जी आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी संविधान सत्याग्रह पदयात्रा सुरू केली आहे. सामान्य जनतेचे, काँग्रेसचे हे एक काऊंटर आहे, असेही तुषार गांधी यावेळी म्हणाले.








