Contractor’s protest in Nagpur : देवा भाऊ पैसे द्या, तुमचं जमलं आता आमचं जमवा !

CM Devendra Fadnavis, give us our money : कंत्राटदारांचे सरकारच्या विरोधात भिक मांगो आंदोलन

Nagpur : राज्यभरातील कंत्राटदारांचे पैसे सरकारने दिलेले नाहीत. सरकारने विविध योजनांची कामे करवून घेतली. त्यासाठी कंत्राटदारांनी घरदार आणि दागिने गहाण ठेवले. येवढेच काय तर जीेएसटीची रक्कमही स्वतःच्या खिशातून भरली. पण सरकारने अद्यापही बिले न काढल्यमुळे कंत्राटदार रस्त्यावर आले आहेत. हक्काचे पैसे मिळण्यासाठी कंत्राटदारांनी नागपूरच्या संविधान चौकात भिक मांगो आंदोलन केले.

राज्यातील शासकीय योजनाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल ९० हजार कोटी रुपये बाकी असल्याचा दावा आंदोलक कंत्राटदारांनी केला आहे. ‘लाडकी बहीण’ सारख्या सर्व योजना सरकार सुरळीपणे चालवत आहे. पण कंत्राटदारांचे पैसे का दिले जात नाहीत, असा सवाल आंदोलकांनी केला. पैसे मिळण्यासाठी कंत्राटदारांनी संविधान चौकात लोकांकडून अक्षरशः भिक मागितली.

Maratha movement : आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास मनाई !

कंत्राटदारांनी आपली घरे, दागिने गहाण ठेऊन कामे पूर्ण केली. त्यामुळे आता तात्काळ थकित बिले देण्यात यावी, अशी मागणी कंत्राटदारांनी केली. संविधान चौकात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन आदी अनेक विभागांची कामे महाराष्ट्र शासनाने कंत्राटदारांकडून करवून घेतली. मात्र त्या कामांचा मोबदला अद्यापही कंत्राटदारांना मिळालेला नाही. त्यामुळे सर्व कंत्राटदारांनी काल (२६ ऑगस्ट) नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले. ‘देवा भाऊ पैसे द्या, तुमचं जमलं आता आमचं जमवा’, अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.