Breaking

Cooperative Sector : अमरावती जिल्ह्यात सहकाराची दोन नवी दालनं उघडणार!

New APMCs established at Bhatkuli and Chikhaldara : भातकुली व चिखलदरा येथे नव्या एपीएमसीची स्थापना

Amravati अमरावती जिल्ह्यात लवकरच दोन नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची (APMC) स्थापना होणार आहे. भातकुली व मेळघाटातील चिखलदरा येथे या समित्या कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रशासकीय प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या दोन बाजार समित्यांमुळे सरकार क्षेत्रातील नेतृत्वाला पुढे येण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बाजार समित्यांची स्थापनेचा प्रस्ताव पुढील आठवड्यात राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे सादर केला जाईल. राज्य शासनाने सहकार क्षेत्राचा विस्तार करून शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.

सध्या भातकुली हे क्षेत्र अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येते, तर चिखलदरा परिसरातील व्यवहार धारणी एपीएमसीमार्फत पार पडतो. मात्र आता या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन केल्यास शेतकऱ्यांना अधिक सुलभ सेवा मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

Engineers association : ४ हजार कोटींच्या मर्यादेत ८९ हजार कोटींची कामं, ठेकेदार संकटात!

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम, १९६३ नुसार या समित्यांची रचना केली जाणार आहे. या अधिनियमांतर्गत धान्ये, फळे, भाजीपाला, पशुधन, मधमाशी पालन, मत्स्य व्यवसाय आणि वन उत्पादनांचा समावेश कृषी माल म्हणून केला जातो. त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध कृषी मालाच्या खरेदी-विक्रीस अधिक सक्षम मंच उपलब्ध होणार आहे.

सहकार विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रत्येक तालुक्यात किमान एक कृषी उत्पन्न बाजार समिती असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने भातकुली आणि चिखलदरा येथे नवीन समित्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पुढील आठवड्यात या समित्यांची प्राथमिक रचना, कामकाजाचा आराखडा आणि अन्य संबंधित माहितीचा समावेश असलेला प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे.