Breaking

Corruption plagued the cooperative sector : बाजार समितीच्या प्रशासकाचा शेतकऱ्यांच्या निधीवर डल्ला !

Bazar Samiti Administrator’s steal the Farmer’s Fund : सहकार क्षेत्राला लागली भ्रष्टाचाराची कीड

Amravati जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. सहकारी बँकेतील पदभरती घोटाळ्यानंतर आता बाजार समितीच्या उपबाजारातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. पदाधिकारी नसल्याचा फायदा घेत प्रशासकानेच शेतकऱ्यांच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे.

अचलपूर बाजार समितीवर कार्यकारणी अस्तित्वात नसताना २०२२-२३ या कालावधीत प्रशासकाचे राज्य होते. या कालावधीत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. बाजार समितीच्या पर्यायाने शेतकऱ्यांच्या रकमेवर डल्ला मारण्यात आला आहे. अस्तित्वात नसलेल्या बाबींवर लाखो रुपये काढल्याचे प्रकरण लेखापरीक्षणामध्ये उजेडात आले आहे. याप्रकरणी विद्यमान कार्यकारणीतील सभापती वर्षा कैलास आवारे यांनी विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

बाजार समितीच्या कार्यकक्षेतील असदपूर, पथ्रोट आणि धामणगाव गढी या उपबाजाराशी संबंधित कामे दाखवण्यात आली. त्यातून लाखो रुपये काढण्यात आले आहे. सर्वात हास्यास्पद म्हणजे पथ्रोट उपबाजारात नाला अस्तित्वात नाही. तरीसुद्धा कृत्रिम नाला शोधून सदर नाल्यावर खर्च केल्याचे दाखविण्यात आले. अशाप्रकारे मोठ्याप्रमाणात फसवणूक झाल्याचे सेवक समितीच्या लक्षात आले आहे.

त्यामुळे सदर कालावधीतील खर्चाची देयके, व्हाउचर्स मागितले. त्यामध्ये अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यामुळे यासंदर्भात विभागीय सहनिबंधक सह. संस्था अमरावती यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. विभागीय सहनिबंधक यांनी चौकशी समिती गठित केली आहे. अशी माहिती सेवक समितीच्या सभापती वर्षा आवारे यांनी दिली आहे.