Breaking

Country Liquor : प्रचारात रिचवली 90 लाखाची ‘देशी’!

Liquor business in full swing during election campaign : लोकसभा, विधानसभा निवडणुकांत दारूचा धंदा जोरात!

Liquor नागरिकांनी 2024 ला अलविदा करीत 2025 या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. जुने वर्ष हे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे चांगलेच चर्चेत राहिले. राजकीय वातावरण गरम असल्याचा फायदा यवतमाळ Yavatmal येथील मद्यपींना मिळाला. देशी, विदेशी, बिअरप्रेमींनी 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये जास्तच दारू घशाखाली रिचविल्याने दारूचा धंदा जोरात राहिला आहे.

प्रसंग दुःखाचा असो अथवा सुखाचा, दारू पिण्यासाठी मद्यपींना केवळ कारण पाहिजे. निवडणुकीत मात्र नेत्यांना हवा देत कार्यकर्त्यांनी सढळ हस्ते खर्च करावयास लावला. त्याचा परिणाम मद्यविक्रीवर झाला. 2024 मध्ये देशी दारूची 90 लाख 93 हजार 354 बल्क लिटर विक्री झाली. तर 2023 मध्ये 85 लाख चार हजार 855 बल्क लिटर विक्री झाली. याचाच अर्थ या वर्षात पाच लाख 88 हजार 499 बल्क लिटर वाढ झाली. तर विदेशी दारू 2024 मध्ये 31 लाख 8 हजार 805 हजार बल्क लिटर तर 2023 मध्ये 28 लाख 48 हजार 120 बल्क लिटर विक्री झाली.

दरवर्षी वाढ..

2023-24 मध्ये 34 हजार 500 बल्क लिटर तर 2024-25 मध्ये 35 हजार 320 ब्लक लिटर वाईनची विक्री झाली. यात लाख 60 हजार 384 बल्क लिटर वाढ झाली आहे. दरवर्षी दारूच्या विक्रीत वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे. देशी, विदेशी, बिअरच्या विक्रीत दरवर्षी वाढ होत आहे. या वर्षात देशी सात टक्के, विदेशी नऊ टक्के, तर बिअरची विक्री आठ टक्क्यांनी वाढली आहे. वाईनध्येही दोन टक्के वाढ झाली आहे.

Akola Politics : राजकीय पक्षांना नव्या नेतृत्वाचे वेध !

विद्यार्थ्यांनी वाढवली विक्री..

मागील काही वर्षात कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी दारूच्या आहारी जात आहेत. पूर्वी विद्यार्थी दारू दुकान सोडाच पान टपरीवर उभे राहण्याची हिंमत करीत नव्हते. आता मात्र, बिनधास्त बिअर बारच्या पायऱ्या चढताना कॉलेजचे तरुण दिसतात. त्याचाही परिणाम विदेशी व बिअरच्या विक्रीवर वाढीच्या स्वरूपात होत आहे.